Past Perfect Tense मधील Active Voice – विषय सूची
Past Perfect Tense मधील Active Voice – विषय सूची
- Past Perfect Tense मधील Active Voice
- Active Voice ची रचना
- Active Voice च्या वाक्यातील Object
- Passive Voice ची रचना करण्याचे नियम
- नियम १ - पहिले स्थान
- नियम २ - दुसरे स्थान
- नियम ३ - तिसरे स्थान
- नियम ४ - चौथे स्थान
- नियम ५ - पाचवे स्थान
- नियम ६ - सहावे स्थान
- Active to Passive Voice ची उदाहरणे
Active Passive Voice हा विषय आधी समजून घ्यावा, जेणेकरून Past Perfect Tense मधील Active Voice समजून घेणे अधिक सोपे होईल.
Past Perfect Tense चा 'Active Voice'
इंग्रजी व्याकरणामधील Active Voice (ऍक्टिव्ह वॉईस्) म्हणजे कर्तरी प्रयोग होय.
Active Voice च्या वाक्यामध्ये जेव्हा had हे Auxiliary Verb वापरलेले असते आणि त्याला जोडून एखादे Past Participle वापरलेले असते, तेव्हा त्या वाक्याला Past Perfect Tense चे वाक्य असे म्हणतात.
Active Voice ची रचना
जेव्हा Past Perfect Tense मधील Active Voice च्या वाक्याचे रूपांतर Passive Voice मध्ये करावयाचे असते, तेव्हा त्या वाक्याचे पुढील घटक लक्षात घ्यावे लागतात.
Subject + had + Past Participle + Objectइंग्रजी वाक्याच्या पहिल्या स्थानी वापरलेला Subject हा वाक्यातील दुसऱ्या स्थानी वापरलेल्या Verb ने सूचित होणारी क्रिया करण्यामध्ये Active (ऍक्टिव्ह) म्हणजे सक्रीय असतो.
तसेच, ही क्रिया वाक्यातील तिसऱ्या स्थानी वापरलेल्या Object वर घडत असते.
Active Voice च्या वाक्यातील Object
Active Voice च्या वाक्याचे रूपांतर Passive Voice मध्ये करण्यासाठी वाक्यामध्ये Object ची आवश्यकता असते.
Object म्हणून सामान्यतः एखादे Noun किंवा Accusative Case चे Pronoun वापरलेले असते आणि ते To च्या Verb ला जोडून वापरलेले असते.
For example (उदाहरणार्थ),
- I had informed them about the event.
- मी त्यांना कार्यक्रमाविषयी सांगितले होते.
वरील वाक्यामध्ये had हे Auxiliary Verb वापरलेले असून त्याला जोडून to inform (सांगणे) या transitive To च्या Verb चे Past Participle चे रूप (informed) वापरलेले आहे.
वाक्याच्या तिसऱ्या स्थानी Object म्हणून them हे Accusative Case चे Pronoun वापरलेले आहे.
तसेच, वाक्याचा Subject म्हणून I हे Nominative Case चे Pronoun वापरलेले आहे.
वाक्याचा हा Subject वाक्यातील क्रिया करण्यामध्ये Active म्हणजे सक्रीय असल्यामुळे हे वाक्य Active Voice चे म्हणजे कर्तरी प्रयोगाचे समजावे.
Passive Voice ची रचना करण्याचे नियम
Past Perfect Tense च्या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढील नियम वापरावेत.
नियम १ (पहिले स्थान)
पहिल्या स्थानी वाक्यातील Object लिहावे.
Object म्हणून जर एखादे Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.
परंतु, Object म्हणून जर Accusative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Nominative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.
| Accusative Case चे Pronoun | Nominative Case चे Pronoun |
|---|---|
| me | I |
| us | We |
| you | You |
| him | He |
| her | She |
| it | It |
| them | They |
नियम २ (दुसरे स्थान)
दुसऱ्या स्थानी had been हे To be चे Verb लिहावे.
नियम ३ (तिसरे स्थान)
तिसऱ्या स्थानी वाक्यातील Past Participle आहे तसेच लिहावे.
नियम ४ (चौथेे स्थान)
चौथ्या स्थानी वाक्यातील उरलेले शब्द लिहावेत.
नियम ५ (पाचवे स्थान)
पाचव्या स्थानी by हे Preposition लिहावे.
नियम ६ (सहावेे स्थान)
सहाव्या स्थानी वाक्यातील Subject लिहावा.
Subject म्हणून जर एखादे Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.
परंतु, Subject म्हणून जर Nominative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Accusative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.
| Nominative Case चे Pronoun | Accusative Case चे Pronoun |
|---|---|
| I | me |
| We | us |
| You | you |
| He | him |
| She | her |
| It | it |
| They | them |
For example (उदाहरणार्थ),
Example 1
Active Voice I had informed them about the event. Passive Voice They had been informed about the event by me.वरील Active Voice च्या वाक्यामध्ये पहिल्या स्थानी Subject म्हणून I हे Nominative Case चे Pronoun वापरलेले आहे.
दुसऱ्या स्थानी had या Auxiliary Verb ला जोडून informed हे Past Participle वापरलेले आहे.
तसेच, तिसऱ्या स्थानी Object म्हणून them हे Pronoun वापरलेले आहे.
या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.
Example 2
Active Voice He had found the bag in the cupboard. Passive Voice The bag had been found in the cupboard by him.वरील Active Voice च्या वाक्यामध्ये पहिल्या स्थानी Subject म्हणून He हे Nominative Case चे Pronoun वापरलेले आहे.
दुसऱ्या स्थानी had या Auxiliary Verb ला जोडून found हे Past Participle वापरलेले आहे.
तसेच, तिसऱ्या स्थानी Object म्हणून bag हे Singular Common Noun वापरलेले आहे.
या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.
Example 3
Active Voice She had known me since long. Passive Voice I had been known since long by her.वरील Active Voice च्या वाक्यामध्ये पहिल्या स्थानी Subject म्हणून She हे Nominative Case चे Pronoun वापरलेले आहे.
दुसऱ्या स्थानी had या Auxiliary Verb ला जोडून known हे Past Participle वापरलेले आहे.
तसेच, तिसऱ्या स्थानी Object म्हणून me हे Accusative Case चे Pronoun वापरलेले आहे.
या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.
Example 4
Active Voice The soldier had sacrificed his life in the war. Passive Voice His life had been sacrificed in the war by the soldier.वरील Active Voice च्या वाक्यामध्ये पहिल्या स्थानी Subject म्हणून soldier हे Singular Common Noun वापरलेले आहे.
दुसऱ्या स्थानी had या Auxiliary Verb ला जोडून sacrificed हे Past Participle वापरलेले आहे.
तसेच, तिसऱ्या स्थानी life या Common Noun ला जोडून his हे Possessive Adjective वापरलेले आहे. त्यामुळे his life या संपूर्ण शब्दसमूहाला Object समजावे.
या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.
Example 5
Active Voice He had rung the bell twice. Passive Voice The bell had been rung twice by him.वरील Active Voice च्या वाक्यामध्ये पहिल्या स्थानी Subject म्हणून He हे Nominative Case चे Pronoun वापरलेले आहे.
दुसऱ्या स्थानी had या Auxiliary Verb ला जोडून rung हे Past Participle वापरलेले आहे.
तसेच, तिसऱ्या स्थानी Object म्हणून bell हे Common Noun वापरलेले आहे.
या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.