Present Perfect Tense मधील Active Voice – विषय सूची
Present Perfect Tense मधील Active Voice – विषय सूची
- Present Perfect Tense मधील Active Voice
- Active Voice ची रचना
- Active Voice च्या वाक्यातील Object
- Passive Voice ची रचना करण्याचे नियम
- नियम १ - पहिले स्थान
- नियम २ - दुसरे स्थान
- नियम ३ - तिसरे स्थान
- नियम ४ - चौथे स्थान
- नियम ५ - पाचवे स्थान
- नियम ६ - सहावे स्थान
- Active to Passive Voice ची उदाहरणे
Active Passive Voice हा विषय आधी समजून घ्यावा, जेणेकरून Present Perfect Tense मधील Active Voice समजून घेणे अधिक सोपे होईल.
Present Perfect Tense चा 'Active Voice'
इंग्रजी व्याकरणामधील Active Voice (ऍक्टिव्ह वॉईस्) म्हणजे कर्तरी प्रयोग होय.
Active Voice च्या वाक्यामध्ये जेव्हा have किंवा has यांपैकी एखादे Auxiliary Verb वापरलेले असते आणि त्याला जोडून एखादे Past Participle वापरलेले असते, तेव्हा त्या वाक्याला Present Perfect Tense चे वाक्य असे म्हणतात.
Active Voice ची रचना
जेव्हा Present Perfect Tense मधील Active Voice च्या वाक्याचे रूपांतर Passive Voice मध्ये करावयाचे असते, तेव्हा त्या वाक्याचे पुढील घटक लक्षात घ्यावे लागतात.
Subject + have / has + Past Participle + Objectइंग्रजी वाक्याच्या पहिल्या स्थानी वापरलेला Subject हा वाक्यातील दुसऱ्या स्थानी वापरलेल्या Verb ने सूचित होणारी क्रिया करण्यामध्ये Active (ऍक्टिव्ह) म्हणजे सक्रीय असतो.
तसेच, ही क्रिया वाक्यातील तिसऱ्या स्थानी वापरलेल्या Object वर घडत असते.
Active Voice च्या वाक्यातील Object
Active Voice च्या वाक्याचे रूपांतर Passive Voice मध्ये करण्यासाठी वाक्यामध्ये Object ची आवश्यकता असते.
Object म्हणून सामान्यतः एखादे Noun किंवा Accusative Case चे Pronoun वापरलेले असते आणि ते To च्या Verb ला जोडून वापरलेले असते.
For example (उदाहरणार्थ),
- They have caught the thief.
- त्यांनी चोराला पकडले आहे.
वरील वाक्यामध्ये have हे Auxiliary Verb वापरलेले असून त्याला जोडून to catch (पकडणे) या transitive To च्या Verb चे Past Participle चे रूप (caught) वापरलेले आहे.
वाक्याच्या तिसऱ्या स्थानी Object म्हणून thief हे Common Noun वापरलेले आहे.
तसेच, वाक्याचा Subject म्हणून They हे Pronoun वापरलेले आहे.
वाक्याचा हा Subject वाक्यातील क्रिया करण्यामध्ये Active म्हणजे सक्रीय असल्यामुळे हे वाक्य Active Voice चे म्हणजे कर्तरी प्रयोगाचे समजावे.
Passive Voice ची रचना करण्याचे नियम
Present Perfect Tense च्या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढील नियम वापरावेत.
नियम १ (पहिले स्थान)
पहिल्या स्थानी वाक्यातील Object लिहावे.
Object म्हणून जर एखादे Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.
परंतु, Object म्हणून जर Accusative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Nominative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.
| Accusative Case चे Pronoun | Nominative Case चे Pronoun |
|---|---|
| me | I |
| us | We |
| you | You |
| him | He |
| her | She |
| it | It |
| them | They |
नियम २ (दुसरे स्थान)
दुसऱ्या स्थानी have been किंवा has been यांपैकी योग्य ते To be चे Verb लिहावे.
Active Voice च्या वाक्यातील Object लक्षात घेऊन योग्य ते To be चे Verb पुढीलप्रमाणे वापरावे.
| Object | To be चे Verb |
|---|---|
| him | has been |
| her | |
| it | |
| Singular Number Noun | |
| me | have been |
| us | |
| you | |
| them | |
| Plural Number Noun |
नियम ३ (तिसरे स्थान)
तिसऱ्या स्थानी वाक्यातील Past Participle आहे तसेच लिहावे.
नियम ४ (चौथेे स्थान)
चौथ्या स्थानी वाक्यातील उरलेले शब्द लिहावेत.
नियम ५ (पाचवे स्थान)
पाचव्या स्थानी by हे Preposition लिहावे.
नियम ६ (सहावेे स्थान)
सहाव्या स्थानी वाक्यातील Subject लिहावा.
Subject म्हणून जर एखादे Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.
परंतु, Subject म्हणून जर Nominative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Accusative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.
| Nominative Case चे Pronoun | Accusative Case चे Pronoun |
|---|---|
| I | me |
| We | us |
| You | you |
| He | him |
| She | her |
| It | it |
| They | them |
For example (उदाहरणार्थ),
Example 1
Active Voice They have caught the thief. Passive Voice The thief has been caught by them.वरील Active Voice च्या वाक्यामध्ये पहिल्या स्थानी Subject म्हणून They हे Nominative Case चे Pronoun वापरलेले आहे.
दुसऱ्या स्थानी have या Auxiliary Verb ला जोडून caught हे Past Participle वापरलेले आहे.
तसेच, तिसऱ्या स्थानी Object म्हणून thief हे Common Noun वापरलेले आहे.
या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.
Example 2
Active Voice Siddharth has swept the whole garden. Passive Voice The whole garden has been swept by Siddharth.वरील Active Voice च्या वाक्यामध्ये पहिल्या स्थानी Subject म्हणून Siddharth हे Plural Noun वापरलेले आहे.
दुसऱ्या स्थानी has या Auxiliary Verb ला जोडून swept हे Past Participle वापरलेले आहे.
तसेच, तिसऱ्या स्थानी garden हे Common Noun वापरले असून त्याला जोडून whole हे Adjective वापरलेले आहे. त्यामुळे, the whole garden या संपूर्ण शब्दसमूहाला Object समजावे.
या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.
Example 3
Active Voice Mother has prepared breakfast in the morning. Passive Voice Breakfast has been prepared in the morning by mother.वरील Active Voice च्या वाक्यामध्ये पहिल्या स्थानी Subject म्हणून Mother हे Singular Common Noun वापरलेले आहे.
दुसऱ्या स्थानी has या Auxiliary Verb ला जोडून prepared हे Past Participle वापरलेले आहे.
तसेच, तिसऱ्या स्थानी Object म्हणून breakfast हे Singular Common Noun वापरलेले आहे.
या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.
Example 4
Active Voice A thief has stolen a golden necklace from a jeweller's shop. Passive Voice A golden necklace has been stolen from a jeweller's shop by a thief.वरील Active Voice च्या वाक्यामध्ये पहिल्या स्थानी Subject म्हणून thief हे Singular Common Noun वापरलेले आहे.
दुसऱ्या स्थानी has या Auxiliary Verb ला जोडून stolen हे Past Participle वापरलेले आहे.
तसेच, तिसऱ्या स्थानी necklace हे Singular Common Noun वापरलेले असून त्याला जोडून golden हे Adjective वापरलेले आहे. त्यामुळे a golden necklace या संपूर्ण शब्दसमूहाला Object समजावे.
या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.
Example 5
Active Voice The Maharashtra Government has undertaken the excavation near the fort. Passive Voice The excavation has been undertaken near the fort by the Maharashtra Government.वरील Active Voice च्या वाक्यामध्ये पहिल्या स्थानी Subject म्हणून Maharashtra Government हे Proper Noun वापरलेले आहे.
दुसऱ्या स्थानी has या Auxiliary Verb ला जोडून undertaken हे Past Participle वापरलेले आहे.
तसेच, तिसऱ्या स्थानी Object म्हणून excavation हे Singular Noun वापरलेले आहे.
या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.