Simple Past Tense मधील Active Voice – विषय सूची
Simple Past Tense मधील Active Voice – विषय सूची
- Simple Past Tense मधील Active Voice
- Active Voice ची रचना
- Active Voice च्या वाक्यातील Object
- Passive Voice ची रचना करण्याचे नियम
- नियम १ - पहिले स्थान
- नियम २ - दुसरे स्थान
- नियम ३ - तिसरे स्थान
- नियम ४ - चौथे स्थान
- नियम ५ - पाचवे स्थान
- नियम ६ - सहावे स्थान
- Active to Passive Voice ची उदाहरणे
Active Passive Voice हा विषय आधी समजून घ्यावा, जेणेकरून Simple Past Tense मधील Active Voice समजून घेणे अधिक सोपे होईल.
Simple Past Tense चा 'Active Voice'
इंग्रजी व्याकरणामधील Active Voice (ऍक्टिव्ह वॉईस्) म्हणजे कर्तरी प्रयोग होय.
Active Voice च्या वाक्यातील To चे Verb जेव्हा Past Tense चे असते, तेव्हा त्या वाक्याला Simple Past Tense चे वाक्य असे म्हणतात.
Active Voice ची रचना
जेव्हा Simple Past Tense मधील Active Voice च्या वाक्याचे रूपांतर Passive Voice मध्ये करावयाचे असते, तेव्हा त्या वाक्याचे पुढील तीन घटक लक्षात घ्यावे लागतात.
Subject + To चे Verb + Objectइंग्रजी वाक्याच्या पहिल्या स्थानी वापरलेला Subject हा वाक्यातील दुसऱ्या स्थानी वापरलेल्या Verb ने सूचित होणारी क्रिया करण्यामध्ये Active (ऍक्टिव्ह) म्हणजे सक्रीय असतो.
तसेच, ही क्रिया वाक्यातील तिसऱ्या स्थानी वापरलेल्या Object वर घडत असते.
Active Voice च्या वाक्यातील Object
Active Voice च्या वाक्याचे रूपांतर Passive Voice मध्ये करण्यासाठी वाक्यामध्ये Object ची आवश्यकता असते.
Object म्हणून सामान्यतः एखादे Noun किंवा Accusative Case चे Pronoun वापरलेले असते आणि ते To च्या Verb ला जोडून वापरलेले असते.
For example (उदाहरणार्थ),
- They played cricket yesterday.
- ते काल क्रिकेट खेळले.
वरील वाक्यामध्ये to play (खेळणे) या transitive To च्या Verb चे Past Tense चे रूप वापरलेले आहे.
वाक्याच्या तिसऱ्या स्थानी Object म्हणून cricket हे Common Noun वापरलेले आहे.
तसेच, वाक्याचा Subject म्हणून They हे Nominative Case चे Pronoun वापरलेले आहे.
वाक्याचा हा Subject वाक्यातील क्रिया करण्यामध्ये Active म्हणजे सक्रीय असल्यामुळे हे वाक्य Active Voice चे म्हणजे कर्तरी प्रयोगाचे समजावे.
Passive Voice ची रचना करण्याचे नियम
Simple Past Tense च्या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढील नियम वापरावेत.
नियम १ (पहिले स्थान)
पहिल्या स्थानी वाक्यातील Object लिहावे.
Object म्हणून जर एखादे Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.
परंतु, Object म्हणून जर Accusative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Nominative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.
| Accusative Case चे Pronoun | Nominative Case चे Pronoun |
|---|---|
| me | I |
| us | We |
| you | You |
| him | He |
| her | She |
| it | It |
| them | They |
नियम २ (दुसरे स्थान)
दुसऱ्या स्थानी was किंवा were यांपैकी योग्य ते To be चे Verb लिहावे.
Active Voice च्या वाक्यातील Object लक्षात घेऊन योग्य ते To be चे Verb पुढीलप्रमाणे वापरावे.
| Object | To be चे Verb |
|---|---|
| me | was |
| him | was |
| her | |
| it | |
| Singular Number Noun | |
| us | were |
| you | |
| them | |
| Plural Number Noun |
नियम ३ (तिसरे स्थान)
तिसऱ्या स्थानी वाक्यातील To च्या Verb चे Past Participle म्हणजे तिसरे रूप लिहावे.
नियम ४ (चौथेे स्थान)
चौथ्या स्थानी वाक्यातील उरलेले शब्द लिहावेत.
नियम ५ (पाचवे स्थान)
पाचव्या स्थानी by हे Preposition लिहावे.
नियम ६ (सहावेे स्थान)
सहाव्या स्थानी वाक्यातील Subject लिहावा.
Subject म्हणून जर एखादे Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.
परंतु, Subject म्हणून जर Nominative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Accusative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.
| Nominative Case चे Pronoun | Accusative Case चे Pronoun |
|---|---|
| I | me |
| We | us |
| You | you |
| He | him |
| She | her |
| It | it |
| They | them |
For example (उदाहरणार्थ),
Example 1
Active Voice Arjuna sent arrows in all directions. Passive Voice Arrows were sent in all directions by Arjuna.वरील Active Voice च्या वाक्यामध्ये पहिल्या स्थानी Subject म्हणून Arjuna हे Noun वापरलेले असून दुसऱ्या स्थानी Past Tense चे To चे Verb वापरलेले आहे.
तसेच, तिसऱ्या स्थानी arrows हे Plural Noun वापरलेले आहे.
या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.
Example 2
Active Voice They played cricket yesterday. Passive Voice Cricket was played yesterday by them.वरील Active Voice च्या वाक्यामध्ये पहिल्या स्थानी Subject म्हणून They हे Nominative Case चे Pronoun वापरलेले असून दुसऱ्या स्थानी Past Tense चे To चे Verb वापरलेले आहे.
तसेच, तिसऱ्या स्थानी cricket हे Noun वापरलेले आहे.
या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.
Example 3
Active Voice People praised the king. Passive Voice The king was praised people.वरील Active Voice च्या वाक्यामध्ये पहिल्या स्थानी Subject म्हणून People हे Noun वापरलेले असून दुसऱ्या स्थानी Past Tense चे To चे Verb वापरलेले आहे.
तसेच, तिसऱ्या स्थानी king हे Singular Noun वापरलेले आहे.
या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.
Example 4
Active Voice Hitler waged war against all of Europe. Passive Voice War was waged against all of Europe by Hitler.वरील Active Voice च्या वाक्यामध्ये पहिल्या स्थानी Subject म्हणून Hitler हे Proper Noun वापरलेले असून दुसऱ्या स्थानी Past Tense चे To चे Verb वापरलेले आहे.
तसेच, तिसऱ्या स्थानी war हे Common Noun वापरलेले आहे.
या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.
Example 5
Active Voice The king rewarded them with a bag of gold. Passive Voice They were rewarded with a bag of gold by the king.वरील Active Voice च्या वाक्यामध्ये पहिल्या स्थानी Subject म्हणून king हे Noun वापरलेले असून दुसऱ्या स्थानी Past Tense चे To चे Verb वापरलेले आहे.
तसेच, तिसऱ्या स्थानी they हे Accusative Case चे Pronoun वापरलेले आहे.
या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.