Simple Present Tense मधील Active Voice – विषय सूची
Simple Present Tense मधील Active Voice – विषय सूची
- Simple Present Tense मधील Active Voice
- Active Voice ची रचना
- Active Voice च्या वाक्यातील Object
- Passive Voice ची रचना करण्याचे नियम
- नियम १ - पहिले स्थान
- नियम २ - दुसरे स्थान
- नियम ३ - तिसरे स्थान
- नियम ४ - चौथे स्थान
- नियम ५ - पाचवे स्थान
- नियम ६ - सहावे स्थान
- Active to Passive Voice ची उदाहरणे
Active Passive Voice हा विषय आधी समजून घ्यावा, जेणेकरून Simple Present Tense मधील Active Voice समजून घेणे अधिक सोपे होईल.
Simple Present Tense चा 'Active Voice'
इंग्रजी व्याकरणामधील Active Voice (ऍक्टिव्ह वॉईस्) म्हणजे कर्तरी प्रयोग होय.
Active Voice च्या वाक्यातील To चे Verb जेव्हा Present Tense चे असते, तेव्हा त्या वाक्याला Simple Present Tense चे वाक्य असे म्हणतात.
Active Voice ची रचना
जेव्हा Simple Present Tense मधील Active Voice च्या वाक्याचे रूपांतर Passive Voice मध्ये करावयाचे असते, तेव्हा त्या वाक्याचे पुढील तीन घटक लक्षात घ्यावे लागतात.
Subject + To चे Verb + Objectइंग्रजी वाक्याच्या पहिल्या स्थानी वापरलेला Subject हा वाक्यातील दुसऱ्या स्थानी वापरलेल्या Verb ने सूचित होणारी क्रिया करण्यामध्ये Active (ऍक्टिव्ह) म्हणजे सक्रीय असतो.
तसेच, ही क्रिया वाक्यातील तिसऱ्या स्थानी वापरलेल्या Object वर घडत असते.
Active Voice च्या वाक्यातील Object
Active Voice च्या वाक्याचे रूपांतर Passive Voice मध्ये करण्यासाठी वाक्यामध्ये Object ची आवश्यकता असते.
Object म्हणून सामान्यतः एखादे Noun किंवा Accusative Case चे Pronoun वापरलेले असते आणि ते To च्या Verb ला जोडून वापरलेले असते.
For example (उदाहरणार्थ),
- They play cricket regularly.
- ते नियमितपणे क्रिकेट खेळतात.
वरील वाक्यामध्ये play (खेळणे) हे Present Tense चे transitive To चे Verb वापरलेले आहे.
वाक्याच्या तिसऱ्या स्थानी Object म्हणून cricket हे Common Noun वापरलेले आहे.
तसेच, वाक्याचा Subject म्हणून They हे Nominative Case चे Pronoun वापरलेले आहे.
वाक्याचा हा Subject वाक्यातील क्रिया करण्यामध्ये Active म्हणजे सक्रीय असल्यामुळे हे वाक्य Active Voice चे म्हणजे कर्तरी प्रयोगाचे समजावे.
Passive Voice ची रचना करण्याचे नियम
Simple Present Tense च्या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढील नियम वापरावेत.
नियम १ (पहिले स्थान)
पहिल्या स्थानी वाक्यातील Object लिहावे.
Object म्हणून जर एखादे Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.
परंतु, Object म्हणून जर Accusative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Nominative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.
| Accusative Case चे Pronoun | Nominative Case चे Pronoun |
|---|---|
| me | I |
| us | We |
| you | You |
| him | He |
| her | She |
| it | It |
| them | They |
नियम २ (दुसरे स्थान)
दुसऱ्या स्थानी am, is किंवा are यांपैकी योग्य ते To be चे Verb लिहावे.
Active Voice च्या वाक्यातील Object लक्षात घेऊन योग्य ते To be चे Verb पुढीलप्रमाणे वापरावे.
| Object | To be चे Verb |
|---|---|
| me | am |
| him | is |
| her | |
| it | |
| Singular Number Noun | |
| us | are |
| you | |
| them | |
| Plural Number Noun |
नियम ३ (तिसरे स्थान)
तिसऱ्या स्थानी वाक्यातील To च्या Verb चे Past Participle म्हणजे तिसरे रूप लिहावे.
नियम ४ (चौथेे स्थान)
चौथ्या स्थानी वाक्यातील उरलेले शब्द लिहावेत.
नियम ५ (पाचवे स्थान)
पाचव्या स्थानी by हे Preposition लिहावे.
नियम ६ (सहावेे स्थान)
सहाव्या स्थानी वाक्यातील Subject लिहावा.
Subject म्हणून जर एखादे Noun वापरलेले असेल, तर ते आहे तसेच लिहावे.
परंतु, Subject म्हणून जर Nominative Case चे Pronoun वापरलेले असेल, तर त्याचे रूपांतर Accusative Case च्या Pronoun मध्ये पुढीलप्रमाणे करावे.
| Nominative Case चे Pronoun | Accusative Case चे Pronoun |
|---|---|
| I | me |
| We | us |
| You | you |
| He | him |
| She | her |
| It | it |
| They | them |
For example (उदाहरणार्थ),
Example 1
Active Voice God protects us. Passive Voice We are protected by God.वरील Active Voice च्या वाक्यामध्ये पहिल्या स्थानी Subject म्हणून God हे Noun वापरलेले असून दुसऱ्या स्थानी Present Tense चे To चे Verb वापरलेले आहे.
तसेच, तिसऱ्या स्थानी us हे Accusative Case चे Pronoun वापरलेले आहे.
या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.
Example 2
Active Voice They play cricket regularly. Passive Voice Cricket is played regularly by them.वरील Active Voice च्या वाक्यामध्ये पहिल्या स्थानी Subject म्हणून They हे Nominative Case चे Pronoun वापरलेले असून दुसऱ्या स्थानी Present Tense चे To चे Verb वापरलेले आहे.
तसेच, तिसऱ्या स्थानी cricket हे Noun वापरलेले आहे.
या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.
Example 3
Active Voice We play football on weekends. Passive Voice Football is played on weekends by us.वरील Active Voice च्या वाक्यामध्ये पहिल्या स्थानी Subject म्हणून We हे Nominative Case चे Pronoun वापरलेले असून दुसऱ्या स्थानी Present Tense चे To चे Verb वापरलेले आहे.
तसेच, तिसऱ्या स्थानी football हे Noun वापरलेले आहे.
या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.
Example 4
Active Voice Satish prepares breakfast on Sunday. Passive Voice Breakfast is prepared on Sunday by Satish.वरील Active Voice च्या वाक्यामध्ये पहिल्या स्थानी Subject म्हणून Satish हे Proper Noun वापरलेले असून दुसऱ्या स्थानी Present Tense चे To चे Verb वापरलेले आहे.
तसेच, तिसऱ्या स्थानी breakfast हे Noun वापरलेले आहे.
या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.
Example 5
Active Voice He breeds cattle for living. Passive Voice Cattle are bred for living by him.वरील Active Voice च्या वाक्यामध्ये पहिल्या स्थानी Subject म्हणून He हे Nominative Case चे Pronoun वापरलेले असून दुसऱ्या स्थानी Present Tense चे To चे Verb वापरलेले आहे.
तसेच, तिसऱ्या स्थानी cattle हे Noun वापरलेले आहे.
या वाक्याचे Passive Voice मध्ये रूपांतर करण्यासाठी वर दिलेल्या नियमांचा उपयोग करण्यात येतो.