had better

had better चा वाक्यातील उपयोग

एखाद्याने एखादी गोष्ट करणे हे चांगले किंवा बरे, असा उपदेशात्मक अर्थ निर्माण करण्यासाठी had better (हॅड् बेटर) च्या रचनेचा उपयोग केला जातो.

विषय सूची
नियम १

एखाद्याने एखादी गोष्ट करणे हे चांगले किंवा बरे, असा उपदेशात्मक अर्थ निर्माण करण्यासाठी had better (हॅड् बेटर) च्या रचनेचा उपयोग केला जातो.

नियम २

Had better च्या रचनेमध्ये जरी had वापरलेले असले, तरी ही रचना Past Perfect Tense ची समजू नये.

नियम ३

तसेच, जरी या रचनेमध्ये better वापरलेले असले, तरी ही रचना Comparative Degree ची सुद्धा समजू नये.

नियम ४

या रचनेमध्ये had better नंतर नेहमी Present Tense चे म्हणजेच पहिल्या रूपाचे To चे Verb वापरलेले असते, हे लक्षात ठेवावे.

For example (उदाहरणार्थ),

Ex. 1
  • When you are among your friends, you had better avoid telling a lie.
  • जेव्हा तू तुझ्या मित्रांमध्ये असतोस, तेव्हा तू खोटे बोलायचे टाळणे चांगले.
Ex. 2
  • Students had better do their homework in time.
  • विद्यार्थ्यांनी त्यांचा गृहपाठ वेळच्या वेळी करणे हे चांगले.
Ex. 3
  • We had better work hard to make a living.
  • उदरनिर्वाह करण्याकरिता आपण कष्ट करावे, हे बरे.
Ex. 4
  • When you will go for an interview, you had better take all the testimonials along with you.
  • जेव्हा तू मुलाखतीला जाशील, तेव्हा तू तुझ्यासोबत सर्व प्रशस्तीपत्रे न्यावीस, हे बरे.
Ex. 5
  • You had better go home now.
  • तू आता आपल्या घरी जावेस, हे बरे.
Ex. 6
  • You had better wear a helmet while driving your motorbike.
  • दुचाकी चालवताना तुम्ही हेल्मेट घालणे चांगले.
व्याकरणातील काही रचना feel like चा वाक्यातील उपयोग

This educational article was first posted on and last updated on by