नियम १
एखादी गोष्ट जेव्हा एखाद्या हेतूने केली जाते, तेव्हा ती गोष्ट करण्यामागचा हेतू व्यक्त करण्यासाठी with a view to या phrase उपयोग केला जातो.
नियम २या phrase चा वापर करताना वाक्यामध्ये to ला जोडून नेहमी Gerund वापरलेले असते.
या रचनेमध्ये to सोबत कधीही Infinitive वापरू नये.
नियम ३Gerund हे प्रत्यक्षात To चे Verb असल्यामुळे ते Transitive (सकर्मक) किंवा Intransitive (अकर्मक) असू शकते.
Transitive (सकर्मक) असल्यास त्याला स्वतःचे Object आणि Extension असू शकते.
Examples (उदाहरणार्थ) Ex. 1- गरीब विद्यार्थांना मदत करण्याच्या हेतूने तिने एक निधी उभारण्याचे ठरविले आहे.
- She has decided to raise a fund with a view to helping poor students.
- काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्याच्या हेतूने पंतप्रधानांनी तातडीची बैठक बोलावली होती.
- The Prime Minister had called an emergency meeting with a view to discussing some important issues.
- त्याने घर बांधण्याच्या हेतूने थोडी जमीन विकत घेतली होती.
- He had bought some land with a view to building a house.