Parts of Sentence
इंग्रजी वाक्याची रचना
इंग्रजी Sentence ची रचना करताना पुढील घटकांचा वाक्याच्या विविध स्थानी उपयोग केला जातो.

Subject (कर्ता)
Subject
Subject (सब्जेक्ट) म्हणजे 'वाक्याचा कर्ता' होय.
इंग्रजी वाक्यातील 'पहिले स्थान' हे नेहमी वाक्याच्या Subject चे म्हणजेच कर्त्याचे असते.
याला Subject (कर्ता) म्हणण्याचे कारण असे की कर्ता म्हणून वापरलेला शब्द / शब्दसमूह हा दुसऱ्या स्थानातील Verb ने सूचित होणारी क्रिया करत असतो.
Verb (क्रियापद)
Verb
Verb (व्हर्ब) म्हणजे वाक्यातील 'क्रियापद' होय.
इंग्रजी वाक्यातील 'दुसरे स्थान' हे नेहमी वाक्याच्या Verb चे म्हणजेच क्रियापदाचे असते.
इंग्रजी व्याकरणात वाक्यातील Verb आपल्याला त्या वाक्यातील Subject च्या Action (क्रिया), State (अवस्था) किंवा Possession (मालकी) यांबद्दल माहिती देते.
Object (कर्म)
Object
Object (ऑब्जेक्ट) म्हणजे वाक्यातील सकर्मक क्रियापदाचे 'कर्म' होय.
इंग्रजी वाक्यातील 'तिसरे स्थान' हे वाक्यातील Object चे म्हणजेच कर्माचे असू शकते.
जेव्हा वाक्यामध्ये Transitive Verb वापरलेले असते, तेव्हाच वाक्याच्या तिसऱ्या स्थानी या सकर्मक क्रियापदाला जोडून Object येऊ शकते.
Complement (पूरक)
Complement
Complement (कॉम्प्लिमेंट) म्हणजे वाक्यातील अकर्मक क्रियापदाचे 'पूरक' होय.
इंग्रजी वाक्यातील 'तिसरे स्थान' हे वाक्यातील Complement चे म्हणजेच पूरकाचे असू शकते.
जेव्हा वाक्यामध्ये Intransitive Verb वापरलेले असते, तेव्हा वाक्याच्या तिसऱ्या स्थानी या अकर्मक क्रियापदाला जोडून Object न वापरता त्याऐवजी Complement वापरले जाते.