Adjective

विशेषण

एखाद्या Noun किंवा Pronoun बद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला 'Adjective' (ऍड्जेक्टिव्ह) म्हणजेच 'विशेषण' असे म्हणतात.

'Adjective' म्हणजे काय?

'Adjective' म्हणजे काय?

एखाद्या Noun किंवा Pronoun बद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला 'Adjective' (ऍड्जेक्टिव्ह) म्हणजेच 'विशेषण' असे म्हणतात.

वाक्यामध्ये वापरलेल्या adjective चा noun किंवा pronoun शी असलेला संबंध हा एकतर Direct (प्रत्यक्ष) असतो किंवा Indirect (अप्रत्यक्ष) असतो.

Adjective चा उद्देश

Adjective चा उद्देश

जेव्हा एखादे adjective वाक्यात वापरले जाते, तेव्हा त्याचा उद्देश त्या वाक्यात वापरलेल्या एखाद्या noun किंवा pronoun बद्दल अधिक माहिती सांगणे आणि त्याला अर्थपूर्ण स्वरूप प्राप्त करून देणे हा असतो.

उदाहरणार्थ -
  • Sachin Tendulkar is a great player.
  • सचिन तेंडूलकर एक महान खेळाडू आहे.

वरील वाक्यामध्ये 'player' या noun ची अधिक माहिती देण्यासाठी 'great' हे adjective वापरलेले आहे.

Direct Use

Direct / Attributive Use (प्रत्यक्ष संबंध)

जेव्हा एखादे adjective एखाद्या noun किंवा pronoun सोबत त्याला जोडून वापरले जाते, तेव्हा त्या adjective चा त्या noun / pronoun शी 'Direct' (डायरेक्ट) म्हणजेच 'प्रत्यक्ष' संबंध येतो.

अशा संबंधाला 'Attributive Use' (ऍट्रिब्युटिव्ह युज्) असेही म्हटले जाते.

उदाहरणार्थ -
  • She is an honest girl.
  • ती एक प्रामाणिक मुलगी आहे.

वरील वाक्यामध्ये 'girl' या noun ची अधिक माहिती देण्यासाठी 'honest' हे adjective वापरलेले असून त्यांचा एकमेकांशी direct संबंध आहे.

Indirect Use

Indirect / Predicative Use (अप्रत्यक्ष संबंध)

जेव्हा एखादे adjective एखाद्या noun किंवा pronoun पासून दूर अंतरावर वापरले जाते, तेव्हा त्या adjective चा त्या noun / pronoun शी 'Indirect' (इनडायरेक्ट) म्हणजेच 'अप्रत्यक्ष' संबंध येतो.

अशा संबंधाला 'Predicative Use' (प्रेडिकेटिव्ह युज्) असेही म्हटले जाते.

उदाहरणार्थ -
  • She is honest.
  • ती प्रामाणिक आहे.

वरील वाक्यामध्ये 'She' या pronoun ची अधिक माहिती देण्यासाठी 'honest' हे adjective वापरलेले असून त्यांचा एकमेकांशी indirect संबंध आहे.

मात्र, हे adjective वाक्यामध्ये pronoun ला जोडून न वापरता त्यापासून दूर अंतरावर वापरले आहे.

Adjective चे प्रकार

Adjective चे प्रकार

Adjectives ची विभागणी पुढे दिल्याप्रमाणे एकूण 'आठ' प्रकारांमध्ये केलेली आहे.

1. Proper Adjective

Proper Adjective (प्रॉपर ऍड्जेक्टिव्ह) म्हणजे विशेषनामापासून तयार होणारे विशेषण होय.

Proper Adjective मध्ये 'Proper Noun' चा म्हणजेच विशेषनामाचा उपयोग विशेषण म्हणून केला जातो.

Proper Adjective विषयी अधिक माहिती

2. Adjective of Quality

Adjective of Quality (ऍड्जेक्टिव्ह ऑफ क्वॉलिटी) म्हणजे 'गुणदर्शक विशेषण' होय.

एखाद्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या Quality चे म्हणजेच गुणाचे वर्णन या Adjective of Quality मुळे करता येते.

Adjective of Quality विषयी अधिक माहिती

3. Adjective of Number

Adjective of Number (ऍड्जेक्टिव्ह ऑफ नंबर) म्हणजे 'संख्यादर्शक विशेषण' होय.

Adjective of Number मध्ये संख्यादर्शक नामाचा उपयोग विशेषण म्हणून केला जातो.

Adjective of Number विषयी अधिक माहिती

4. Adjective of Quantity

Adjective of Quantity (ऍड्जेक्टिव्ह ऑफ क्वॉन्टिटी) म्हणजे 'परिमाणदर्शक विशेषण' होय.

संख्येने मोजता न येणाऱ्या नामासोबत Adjective of Quantity वापरले जाते.

Adjective of Quantity विषयी अधिक माहिती

5. Demonstrative Adjective

Demonstrative Adjective (डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍड्जेक्टिव्ह) म्हणजे 'दर्शक विशेषण' होय.

जाणीवपूर्वक एखादी व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी Demonstrative Adjective वापरले जाते.

Demonstrative Adjective विषयी अधिक माहिती

6. Possessive Adjective

Possessive Adjective (पझेसिव्ह ऍड्जेक्टिव्ह) म्हणजे 'षष्ठी विभक्तीचे विशेषण' होय.

एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूबद्दल Possession म्हणजेच स्वामित्व दर्शविण्यासाठी Possessive Adjective चा उपयोग केला जातो.

Possessive Adjective विषयी अधिक माहिती

7. Distributive Adjective

Distributive Adjective (डिस्ट्रिब्युटिव्ह ऍड्जेक्टिव्ह) म्हणजे 'वितरणदर्शक विशेषण' होय.

एखाद्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा उल्लेख एकमेवपणे किंवा स्वतंत्रपणे करण्यासाठी Distributive Adjective चा उपयोग केला जातो.

Distributive Adjective विषयी अधिक माहिती

8. Interrogative Adjective

Interrogative Adjective (इंटरॉगेटिव्ह ऍड्जेक्टिव्ह) म्हणजे 'प्रश्नार्थक विशेषण' होय.

एखाद्या प्रश्नार्थक वाक्यामध्ये Interrogative Adjective चा उपयोग केला जातो.

Interrogative Adjective विषयी अधिक माहिती

Pronoun Proper Adjective

This educational article was first posted on and last updated on by