Cumulative Coordinating Conjunction

Coordinating Conjunction चे उपप्रकार

Cumulative Coordinating Conjunction हा एक Coordinating Conjunction चा प्रकार आहे.

Cumulative Coordinating Conjunction

Cumulative Coordinating Conjunction

Cumulative Coordinating Conjunction (क्युम्यूलेटिव्ह कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्) म्हणजे 'संकलनदर्शक सम-संयोगी उभयान्वयी अव्यय' होय.

Cumulative Coordinating Conjunction हा एक Coordinating Conjunction चा प्रकार आहे.

Cumulative Coordinating Conjunction चा उपयोग पूर्णपणे स्वतंत्र असलेली समान दर्जाची उपवाक्ये म्हणजेच Coordinating Clauses एकमेकांना जोडण्यासाठी केला जातो.

तसेच, समान दर्जाचे शब्द किंवा Phrases अथवा Simple Sentences यांना जोडण्यासाठीसुद्धा Cumulative Coordinating Conjunction चा उपयोग केला जातो.

Cumulative Coordinating Conjunction करून तयार झालेल्या वाक्याला Compound Sentence (कम्पाउंड सेन्टेन्स) म्हणजेच संयुक्त वाक्य असे म्हणतात.

वाक्यांचा एकमेकांमध्ये समावेश

वाक्यांचा एकमेकांमध्ये समावेश

Cumulative Coordinating Conjunction ने जेव्हा दोन किंवा अधिक वाक्ये एकमेकांना जोडलेली असतात, तेव्हा त्या वाक्यांचे अर्थ एकमेकांमध्ये समाविष्ट केलेले असतात.

अशा अर्थाच्या एकत्रित संकलनामुळेच त्याला Cumulative म्हणजे संकलनदर्शक अशी संज्ञा दिलेली आहे.

For example (उदाहरणार्थ),
  • मी दुकानामध्ये गेलो आणि नवीन फोन विकत घेतला.
  • I went to the shop and bought a new phone.

वरील वाक्यामध्ये I went to the shop आणि I bought a new phone ही दोन वाक्ये एकमेकांना जोडण्यासाठी and  या Coordinating Conjunction चा उपयोग केला आहे.

या दोन्हीही वाक्यांचे अर्थ एकत्रित करून संपूर्ण वाक्याचा अर्थ तयार होत असल्यामुळे and  ला Cumulative Coordinating Conjunction ही संज्ञा दिलेली आहे.

Cumulative Coordinating Conjunctions ची यादी

Cumulative Coordinating Conjunctions ची यादी

Conjunction

(उभयान्वयी अव्यय)

Marathi Meaning

(मराठी अर्थ)

and
(ऍंड)
आणि
both...and
(बोथ...ऍंड)
आणि
as well as
(ऍज् वेल् ऍज्)
सुद्धा, शिवाय
not only...but also
(नॉट ओन्ली...बट अल्सो)
हेसुद्धा आणि तेसुद्धा
Coordinating Conjunction Alternative Coordinating Conjunction

This educational article was first posted on and last updated on by