Pronoun

सर्वनाम

वाक्यातील एखाद्या Noun चा वारंवार होणारा उपयोग टाळण्यासाठी त्या Noun ऐवजी ज्या शब्दाचा वापर केला जातो, त्याला 'Pronoun' (प्रोनाऊन) म्हणजेच 'सर्वनाम' असे म्हणतात.

'Pronoun' म्हणजे काय?

'Pronoun' म्हणजे काय?

इंग्रजी व्याकरणात कधीकधी एखाद्या वाक्यामध्ये किंवा वाक्यसमूहामध्ये एखाद्या Noun चा वारंवार उपयोग करावा लागतो.

असा वारंवार होणारा उपयोग टाळण्यासाठी त्या Noun ऐवजी ज्या शब्दाचा वापर केला जातो, त्याला 'Pronoun' (प्रोनाऊन) म्हणजेच 'सर्वनाम' असे म्हणतात.

Pronoun चा उपयोग एखाद्या Simple Sentence मध्ये वाक्याच्या 'पहिल्या स्थानी' किंवा 'तिसऱ्या स्थानी' केला जातो.

Case आणि Person

Pronoun ची Case आणि Person

इंग्रजी व्याकरणामध्ये प्रत्येक Pronoun चे वर्गीकरण निश्चित आणि कायम स्वरूपाच्या 'Case' (विभक्ती) मध्ये केलेले आहे.

तसेच, प्रत्येक Pronoun चे वर्गीकरण निश्चित आणि कायम स्वरूपाच्या 'Person' (पुरूष) मध्ये सुद्धा केलेले आहे.

Nominative Case

Nominative Case चे Pronoun

वाक्यात पहिल्या स्थानी वापरलेले pronoun हे नेहमी 'Nominative Case' चे समजले जाते.

Nominative case चे pronoun हे वाक्यात फक्त पहिल्या स्थानी 'Subject' म्हणून वापरतात. हे pronoun कधीही तिसऱ्या स्थानी 'Object' म्हणून वापरू नये.

Nominative Case च्या Pronouns ची यादी
Person (पुरुष) Number (वचन) Pronoun (सर्वनाम)
First Person (प्रथम पुरुष) Singular I (मी)

 

Plural We (आम्ही)
Second Person (द्वितीय पुरुष) Singular You (तू)

 

Plural You (तुम्ही)
Third Person (तृतीय पुरुष) Singular He (तो)

 

 

She (ती)

 

 

It (तो / ती / ते)

 

Plural They (ते / त्या / ती)
Accusative Case

Accusative Case चे Pronoun

वाक्यात 'तिसऱ्या स्थानी' वापरलेले pronoun हे नेहमी 'Accusative Case' चे समजले जाते.

Accusative case चे pronoun हे वाक्यात फक्त तिसऱ्या स्थानी 'Object' म्हणून वापरतात. हे pronoun कधीही पहिल्या स्थानी 'Subject' म्हणून वापरू नये.

Accusative Case च्या Pronouns ची यादी
Person (पुरुष) Number (वचन) Pronoun (सर्वनाम)
First Person (प्रथम पुरुष) Singular me (मला)

 

Plural us (आम्हाला)
Second Person (द्वितीय पुरुष) Singular you (तुला)

 

Plural you (तुम्हाला)
Third Person (तृतीय पुरुष) Singular him (त्याला)

 

 

her (तिला)

 

 

it (त्याला / तिला)

 

Plural them (त्यांना)
Possessive Case

Possessive Case चे Pronoun

Possessive case चे pronoun हे वाक्यात स्वतंत्रपणे न वापरता एखाद्या Noun च्या अगोदर त्याला जोडून वापरतात. त्यामुळे, हे Noun ज्या स्थानी असते, त्या स्थानात या pronoun ला राहावे लागते.

जोपर्यंत हे pronoun स्वतंत्र असते, तोपर्यंत त्याला Possessive case चे pronoun समजावे.

परंतु, जेव्हा ते एखाद्या noun ला जोडून वापरले जाते, तेव्हा त्याला 'Possessive Adjective' असे म्हणतात.

Possessive Case च्या Pronouns ची यादी
Person (पुरुष) Number (वचन) Pronoun (सर्वनाम)
First Person (प्रथम पुरुष) Singular my (माझा / माझी / माझे / माझ्या)

 

Plural our (आमचा / आमची / आमचे / आमच्या)
Second Person (द्वितीय पुरुष) Singular your (तुझा / तुझी / तुझे / तुझ्या)

 

Plural your (तुमचा / तुमची / तुमचे / तुमच्या)
Third Person (तृतीय पुरुष) Singular his (त्याचा / त्याची / त्याचे / त्याच्या)

 

 

her (तिचा / तिची / तिचे / तिच्या)

 

 

its (त्याचा / त्याची / त्याचे / त्याच्या) (तिचा / तिची / तिचे / तिच्या)

 

Plural their (यांचा / त्यांची / त्यांचे / त्यांच्या)
List of Pronouns

List of Pronouns

Person Nominative Accusative Possessive
First I, We me, us my, our
Second You you your
Third He, She, It, They him, her, it, them his, her, its, their
Agent Noun Adjective

This educational article was first posted on and last updated on by