Tense

काळ, कालविचार

वाक्यातील 'Verb' च्या स्वरूपावरून त्याने दर्शविलेली क्रिया कधी घडते याचा जो बोध होतो, त्याला 'Tense' असे म्हणतात.

'Tense' म्हणजे काय?

'Tense' म्हणजे काय?

इंग्रजी व्याकरणात प्रत्येक लिहिल्या किंवा बोलल्या जाणाऱ्या sentence चा संबंध 'Tense' (टेन्स) म्हणजे 'काळाशी' असतो.

वाक्यातील 'Verb' च्या स्वरूपावरून त्याने दर्शविलेली क्रिया कधी घडते याचा जो बोध होतो, त्याला 'Tense' असे म्हणतात.

या tenses ची विभागणी त्यांचा वापर आणि त्यांची रचना लक्षात घेऊन पुढीलप्रमाणे 'चार' वेगवेगळ्या प्रकारांमध्ये केलेली आहे.

Simple Series

Simple Series

'Simple Series Tense' (सिम्पल सिरीज टेन्स) म्हणजे 'साधा काळ' होय.

Simple series tense मधून एखादी क्रिया नित्यनेमाने चालते किंवा होऊन गेलेली असते अथवा पुढे केव्हातरी होणार आहे, असे सूचित करायचे असते.

Simple series tense मध्ये पुढील tenses चा समावेश होतो -

Continuous Series

Continuous Series

'Continuous Series Tense' (कंटीन्युअस सिरीज टेन्स) म्हणजे 'चालू काळ' होय.

Continuous series tense मधून एखादी क्रिया वर्तमानकाळात किंवा भूतकाळात सतत परंतु अल्पकाळ चालू असते किंवा ती भविष्यकाळात केव्हा तरी निश्चित घडत असेल असे आपल्याला खात्रीपूर्वक वाटते.

Continuous series tense मध्ये पुढील tenses चा समावेश होतो -

Perfect Series

Perfect Series

'Perfect Series Tense' (परफेक्ट सिरीज टेन्स) म्हणजे 'पूर्ण काळ' होय.

Perfect series tense मध्ये एखादी क्रिया शंभर टक्के नुकतीच पूर्ण झालेली असते किंवा शंभर टक्के खूप आधी पूर्ण झालेली असते किंवा भविष्यकाळात नक्की पूर्ण केलेली असेलच अशी आपल्याला खात्री असते.

Perfect series tense मध्ये पुढील tenses चा समावेश होतो -

Perfect Continuous Series

Perfect Continuous Series

'Perfect Continuous Series Tense' (परफेक्ट कंटीन्युअस सिरीज टेन्स) म्हणजे 'चालू पूर्ण काळ' होय.

Perfect continuous series tense मध्ये एखादी क्रिया वर्तमानकाळात किंवा भूतकाळात किंवा भविष्यकाळात सतत परंतु दीर्घकाळ चालू असते.

Perfect continuous series tense मध्ये पुढील tenses चा समावेश होतो -

Gender Simple Present Tense

This educational article was first posted on and last updated on by