Complement

वाक्यातील पूरक

इंग्रजी वाक्यातील तिसऱ्या स्थानी वाक्यातील Complement (कॉम्प्लिमेंट) म्हणजेच पूरक वापरले जाते.

Complement चे वाक्यातील स्थान

Complement चे वाक्यातील स्थान

इंग्रजी वाक्यातील तिसऱ्या स्थानी वाक्यातील Complement (कॉम्प्लिमेंट) म्हणजेच पूरक वापरले जाते.

 

Complement placement in English sentence

Complement कसे ओळखावे?

Complement कसे ओळखावे?

वाक्यातील दुसऱ्या स्थानातील verb ला जर 'काय' किंवा 'कोणाला' यांपैकी एखादा प्रश्न विचारता येत नसेल, तर ते verb नेहमी 'intransitive' म्हणजे 'अकर्मक' आहे असे समजावे.

जेव्हा वाक्यामध्ये intransitive verb वापरलेले असते, तेव्हा वाक्याच्या 'तिसऱ्या स्थानी' या अकर्मक क्रियापदाला जोडून object न वापरता त्याऐवजी complement वापरले जाते.

Complement चा वाक्यातील उपयोग

Complement चा वाक्यातील उपयोग

वाक्यातील intransitive verb (अकर्मक क्रियापद) ने सूचित होणाऱ्या क्रियेचा अर्थ पूर्ण करण्यासाठी complement वापरले जाते.

उदाहरणार्थ –
  • He fell sick.
  • तो आजारी पडला.

या वाक्यामध्ये fall (फॉल = पडणे) या क्रियापदाला 'काय' किंवा 'कोणाला' यांपैकी कोणताही प्रश्न विचारता येत नाही.

त्यामुळे, या वाक्यामध्ये sick चा उपयोग वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी complement (पूरक) म्हणून केला आहे.

Complement चे स्वरूप

वाक्यातील Complement चे स्वरूप

वाक्यातील complement हे सामान्यतः पुढीलपैकी एखाद्या स्वरूपाचे असते -

  • Noun (नाम)
  • Accusative or Dative Case (द्वितीया विभक्ती) चे Pronoun (सर्वनाम)
  • Infinitive (क्रियापदाचे मूळरूप) ने सुरू होणारी Noun Phrase (नामवाचक वाक्यांश)
  • Gerund (धातुसाधित नाम) ने सुरू होणारी Noun Phrase (नामवाचक वाक्यांश)
  • Adjective (विशेषण)
  • Adverb (क्रियाविशेषण)
  • Preposition (शब्दयोगी अव्यय) ने सुरू होणारी Adverb Phrase (क्रियाविशेषणात्मक वाक्यांश)
Object Parts of Speech

This educational article was first posted on and last updated on by