Subject

वाक्याचा कर्ता

इंग्रजी वाक्यातील पहिले स्थान हे नेहमी वाक्याच्या Subject (सब्जेक्ट) चे म्हणजेच कर्त्याचे असते.

Subject चे वाक्यातील स्थान

Subject चे वाक्यातील स्थान

इंग्रजी वाक्यातील पहिले स्थान हे नेहमी वाक्याच्या Subject (सब्जेक्ट) चे म्हणजेच कर्त्याचे असते.

 

 

याला Subject (कर्ता) म्हणण्याचे कारण असे की कर्ता म्हणून वापरलेला शब्द / शब्दसमूह हा दुसऱ्या स्थानातील Verb ने सूचित होणारी क्रिया करत असतो.

Active Voice (कर्तरी प्रयोग)

Active Voice (कर्तरी प्रयोग)

दुसऱ्या स्थानातील Verb ने सूचित होणारी क्रिया करण्यामध्ये वाक्याचा Subject मग्न असल्यामुळे त्याला Active असे म्हणतात.

येथे Active या शब्दाचा अर्थ 'सक्रीय' किंवा 'कार्यात मग्न' असा समजावा.

त्यामुळे अशा वाक्याला इंग्रजी व्याकरणामध्ये 'Active Voice' चे म्हणजेच 'कर्तरी प्रयोगाचे वाक्य' असे म्हणतात.

Subject ची विभक्ती

Subject ची विभक्ती

इंग्रजी वाक्याचा Subject हा नेहमी 'Nominative Case' चा म्हणजे 'प्रथमा विभक्तीचा' समजला जातो.

Imperative Sentence चा Subject

Imperative Sentence चा Subject

कोणत्याही Imperative Sentence (आज्ञार्थी वाक्य) मध्ये वाक्याचा Subject हा गृहीत धरलेला असतो.

अशा वाक्यामध्ये वाक्याचा Subject स्पष्टपणे (explicitly) लिहिण्याची आवश्यकता नसते.

उदाहरणार्थ -
  • Thank you.

वरील वाक्य I thank you अशा स्वरूपाचे असून त्यामध्ये I हा वाक्याचा Subject आहे.

मात्र, हे वाक्य Imperative Sentence असल्यामुळे वाक्याचा Subject गृहीत धरलेला असून तो स्पष्टपणे लिहिण्याची आवश्यकता नाही.

Exclamatory Sentence चा Subject

Exclamatory Sentence चा Subject

कोणत्याही Exclamatory Sentence (उद्गारार्थी वाक्य) मध्ये वाक्याचा Subject हा गृहीत धरलेला असतो.

अशा वाक्यामध्ये वाक्याचा Subject स्पष्टपणे (explicitly) लिहिण्याची आवश्यकता नसते.

उदाहरणार्थ -
  • Well done!

वरील वाक्य That was well done अशा स्वरूपाचे असून त्यामध्ये That हा वाक्याचा Subject आहे.

हे वाक्य Exclamatory Sentence असल्यामुळे वाक्याचा Subject गृहीत धरलेला असून तो स्पष्टपणे लिहिण्याची आवश्यकता नाही.

वाक्यातील Subject चे स्वरूप

वाक्यातील Subject चे स्वरूप

वाक्याचा Subject हा सामान्यतः पुढीलपैकी एखाद्या स्वरूपाचा असतो -

  • Noun (नाम)
  • Nominative Case (प्रथमा विभक्ती) चे Pronoun (सर्वनाम)
  • Noun Phrase (नामवाचक वाक्यांश)
  • Gerund (धातुसाधित नाम) ने सुरू होणारी Noun Phrase (नामवाचक वाक्यांश)
Parts of Sentence Object

This educational article was first posted on and last updated on by