'Interrogative Adjective' म्हणजे काय?
'Interrogative Adjective' म्हणजे काय?
'Interrogative Adjective' (इंटरॉगेटिव्ह ऍड्जेक्टिव्ह) चा मराठी अर्थ 'प्रश्नार्थक विशेषण' असा आहे.
या adjective चा उपयोग नेहमी 'प्रश्नार्थक' वाक्यामध्येच केलेला असतो.
Interrogative Adjective ची काही वैशिष्ट्ये
Interrogative Adjective ची काही वैशिष्ट्ये
- Interrogative Adjective मध्ये 'which' (व्हिच) आणि 'what' (व्हॉट) या दोन adjectives चा समावेश होतो.
- इंग्रजी व्याकरणामध्ये एखाद्या प्रश्नार्थक वाक्यामध्ये जेव्हा what किंवा which एखाद्या noun ला जोडून वापरलेले असते, तेव्हा त्याला Interrogative Adjective असे म्हणतात.
- which चा उपयोग एखाद्या विशिष्ट गोष्टीचा उल्लेख करण्यासाठी केलेला असतो, तर what चा उपयोग सर्वसाधारण अर्थाने करण्यात येतो.
Interrogative Adjective ची उदाहरणे
Interrogative Adjective ची उदाहरणे
Example 1
- What book are you looking for?
- तुम्ही कोणते पुस्तक शोधात आहात?
Example 2
- Which book do you like the most?
- तुम्हाला कोणते पुस्तक सर्वात जास्त आवडते?
Example 3
- What recipe was selected in the finals?
- अंतिम फेरीमध्ये कोणती पाकक्रिया निवडण्यात आली?
Example 4
- Which bowler has taken the most number of wickets in one day international cricket?
- एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्या गोलंदाजाने सर्वात जास्त बळी घेतले आहेत?