Parts of Speech

भाषेचे भाग

इंग्रजी भाषेतील शब्दांचे एकूण 'आठ' भाग करण्यात आले आहेत. या भागांना Parts of Speech असे म्हणतात.

Overview - Parts of Speech

Parts of Speech

इंग्रजी भाषा ज्या Sentence पासून तयार होते, ते प्रत्येक sentence हे शब्दांपासून तयार होते.

हे शब्द असंख्य असल्यामुळे त्यांचा अभ्यास करणे सोपे आणि सोयीचे व्हावे, म्हणून या शब्दांचे एकूण 'आठ' भाग करण्यात आले आहेत.

या भागांना इंग्रजी व्याकरणात 'Parts of Speech' (पार्ट्स ऑफ स्पीच) अर्थात 'भाषेचे भाग' असे म्हणतात.

इंग्रजी व्याकरणातील Parts of Speech पुढीलप्रमाणे आहेत.

Noun (नाम)

1. Noun

Noun (नाऊन) म्हणजे 'नाम' होय.

जगातील सर्व गोष्टींना काही ना काही नावाने आपण ओळखतो. अशा सर्व नावांना nouns असे म्हणतात.

इंग्रजी व्याकरणातील nouns ची विभागणी एकूण 'सहा' प्रकारांमध्ये केलेली आहे.

Noun विषयी अधिक माहिती

Pronoun (सर्वनाम)

2. Pronoun

Pronoun (प्रोनाऊन) म्हणजे 'सर्वनाम' होय.

इंग्रजी वाक्यात एखाद्या noun च्या जागी pronoun चा उपयोग केला जातो.

इंग्रजी व्याकरणातील सर्व pronouns चे वर्गीकरण निश्चित आणि कायम स्वरूपाच्या cases (विभक्ती) आणि persons (पुरूष) यांमध्ये केलेले आहे.

Pronoun विषयी अधिक माहिती

Adjective (विशेषण)

3. Adjective

Adjective (ऍड्जेक्टिव्ह) म्हणजे 'विशेषण' होय.

इंग्रजी वाक्यामध्ये adjective चा उपयोग एखाद्या नामाविषयी अधिक माहिती सांगण्यासाठी केला जातो.

जेव्हा एखादे adjective वाक्यात वापरले जाते, तेव्हा त्याचा उद्देश त्या वाक्यात वापरलेल्या एखाद्या noun किंवा pronoun बद्दल अधिक माहिती सांगणे आणि त्याला अर्थपूर्ण स्वरूप प्राप्त करून देणे हा असतो.

Adjective विषयी अधिक माहिती

Verb (क्रियापद)

4. Verb

Verb (व्हर्ब) म्हणजे 'क्रियापद' होय.

इंग्रजी व्याकरणामध्ये verb चा उपयोग वाक्यात घडणारी क्रिया दर्शविण्यासाठी केला जातो.

इंग्रजी व्याकरणात वाक्यातील verb आपल्याला त्या वाक्यातील subject च्या action (क्रिया), state (अवस्था) किंवा possession (मालकी) यांबद्दल माहिती देते.

Verb विषयी अधिक माहिती

Adverb (क्रियाविशेषण)

5. Adverb

Adverb (ऍड्व्हर्ब) म्हणजे 'क्रियाविशेषण अव्यय' होय.

इंग्रजी वाक्यातील adverb हे क्रियापदाने दर्शविलेल्या क्रियेविषयी अधिक माहिती देते.

इंग्रजी व्याकरणातील adverbs ची विभागणी एकूण 'आठ' प्रकारांमध्ये केलेली आहे.

Adverb विषयी अधिक माहिती

Preposition (शब्दयोगी अव्यय)

6. Preposition

Preposition (प्रेपोझिशन्) म्हणजे 'शब्दयोगी अव्यय' होय.

एखाद्या नामाचा किंवा सर्वनामाचा दुसऱ्या शब्दाशी असलेला संबंध दर्शविण्यासाठी preposition वापरले जाते.

Preposition विषयी अधिक माहिती

Conjunction (उभयान्वयी अव्यय)

7. Conjunction

Conjunction (कंजंक्शन्) म्हणजे 'उभयान्वयी अव्यय' होय.

एकापेक्षा अधिक शब्द किंवा वाक्ये जोडण्यासाठी conjunction चा उपयोग केला जातो.

इंग्रजी व्याकरणामध्ये conjunction चे coordinating conjunction आणि subordinating conjunction असे दोन मुख्य प्रकार आहेत.

Conjunction विषयी अधिक माहिती

Interjection (केवलपायोगी अव्यय)

8. Interjection

Interjection (इंटरजेक्शन्) म्हणजे 'केवलप्रयोगी अव्यय' होय.

एखादी भावना (emotion) व्यक्त करण्यासाठी interjection चा उपयोग केला जातो.

Complement Noun

This educational article was first posted on and last updated on by