Adverb of Manner म्हणजे काय?
Adverb of Manner म्हणजे काय?
Adverb of Manner (ऍड्व्हर्ब ऑफ मॅनर) म्हणजे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय होय.
वाक्यातील घडत असलेली क्रिया कशा प्रकारे किंवा कशा रीतीने घडत आहे, याविषयी अधिक माहिती देण्यासाठी Adverb of Manner चा उपयोग केला जातो.
'How' ने सुरू होणारा प्रश्न
'How' ने सुरू होणारा प्रश्न
वाक्याचा subject हा वाक्यातील verb ने सूचित होणारी क्रिया कशा प्रकारे किंवा कशा रीतीने करत आहे, हे दर्शविण्यासाठी Adverb of Manner चा उपयोग केला जातो.
How (हाऊ) ने सुरू होणाऱ्या प्रश्नाचे उत्तर हे Adverb of Manner शी संबंधित असते.
For example (उदाहरणार्थ),
- त्याने त्याचे काम सावकाशपणे केले.
- He did his work slowly.
वरील वाक्यामध्ये slowly हे Adverb of Manner वापरलेले आहे.
या वाक्याला How did he do his work? असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर slowly असे येते.
काही Adverbs of Manner
इंग्रजी व्याकरणातील काही Adverbs of Manner
Adverbs of Manner मध्ये समाविष्ट असलेले काही adverbs पुढे दिल्याप्रमाणे आहेत.
|
Adverb of Manner (रीतिवाचक क्रियाविशेषण) |
Meaning (मराठी अर्थ) |
|---|---|
|
badly (बॅड्ली) |
वाईट रीतीने |
|
quickly (क्विक्ली) |
पटकन |
|
well (वेल्) |
बऱ्यापैकी, चांगले |
|
fast (फास्ट) |
वेगाने, जलद रीतीने |
|
slowly (स्लोली) |
सावकाशपणे, हळू हळू |
|
sweetly (स्वीट्ली) |
गोडपणे |
काही उदाहरणे
Adverb of Manner ची काही उदाहरणे
Example 1
- शर्यत जिंकण्यासाठी ती खूप वेगाने पळत होती.
- She was running fast to win the race.
Example 2
- त्यांनी परीक्षेमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
- They have done well in the examination.
Example 3
- क्षेत्ररक्षकाने चेंडू पटकन फेकला.
- The fielder threw the ball quickly.
Example 4
- तो तिच्यासोबत वाईट रीतीने वागत आहे.
- He has been behaving badly with her.
Example 5
- ती त्याच्याशी गोडपणे बोलत होती.
- She was talking sweetly with him.