Adverb of Time म्हणजे काय?
Adverb of Time म्हणजे काय?
Adverb of Time (ऍड्व्हर्ब ऑफ टाईम) म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय होय.
वाक्यातील घडत असलेली क्रिया कधी / केव्हा घडत आहे, याविषयी अधिक माहिती देण्यासाठी Adverb of Time चा उपयोग केला जातो.
'When' ने सुरू होणारा प्रश्न
'When' ने सुरू होणारा प्रश्न
वाक्याचा subject हा वाक्यातील verb ने सूचित होणारी क्रिया कधी किंवा केव्हा करत आहे, हे दर्शविण्यासाठी Adverb of Time चा उपयोग केला जातो.
When (व्हेन) ने सुरू होणाऱ्या प्रश्नाचे उत्तर हे Adverb of Time शी संबंधित असते.
For example (उदाहरणार्थ),
- आम्हाला उद्या सुट्टी आहे.
- We have a holiday tomorrow.
वरील वाक्यामध्ये tomorrow हे Adverb of Time वापरलेले आहे.
या वाक्याला When do we have a holiday? असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर tomorrow असे येते.
काही Adverbs of Time
इंग्रजी व्याकरणातील काही Adverbs of Time
Adverbs of Time मध्ये समाविष्ट असलेले काही adverbs पुढे दिल्याप्रमाणे आहेत.
| Adverb of Time (कालवाचक क्रियाविशेषण) | Meaning (मराठी अर्थ) |
|---|---|
| now (नाऊ) | आता |
| then (देन्) | नंतर |
| today (टुडे) | आज |
| tomorrow (टुमॉरो) | उद्या |
| tonight (टुनाईट) | आज रात्री |
| yesterday (येस्टरडे) | काल |
| ago (ऍगो) | पूर्वी |
| soon (सून) | लवकरच |
| early (अर्ली) | लवकर |
काही उदाहरणे
Adverb of Time ची काही उदाहरणे
Example 1
- राजेश आता एक पुस्तक वाचत आहे.
- Rajesh is reading a book now.
Example 2
- तो उशीरा घरी पोचला.
- He reached home late.
Example 3
- काल त्याने नवीन गाडी विकत घेतली.
- He bought a new car yesterday.
Example 4
- नाटक लवकरच सुरू होईल.
- The play will start soon.
Example 5
- आज रात्री आम्ही बाहेर जेवायला जाणार आहोत.
- We are going out for dinner tonight.