'Case' म्हणजे काय?
इंग्रजी व्याकरणातील 'Case'
इंग्रजी व्याकरणामध्ये एखाद्या Noun किंवा Pronoun चा दुसऱ्या एखाद्या शब्दाशी असलेला संबंध दर्शविण्यासाठी त्यांच्या स्वरूपांत काही बदल केला जातो.
Noun किंवा Pronoun च्या स्वरूपांत होणारा बदल दर्शविण्यासाठी 'Case' (केस) म्हणजेच 'विभक्ती' ही संज्ञा वापरली जाते.
Case चे प्रकार
Case चे प्रकार
इंग्रजी व्याकरणात case चे पुढीलप्रमाणे एकूण 'चार' प्रकार आहेत.
1. Nominative Case
'Nominative Case' (नॉमिनेटीव्ह केस) म्हणजे 'प्रथमा विभक्ती' होय.
इंग्रजी व्याकरणातील 'Subject' हा नेहमी Nominative Case चा समजला जातो.
Read more about Nominative Case
2. Accusative Case
'Accusative Case' (ऍक्युझिटिव्ह केस) म्हणजे 'द्वितीया किंवा चतुर्थी विभक्ती' होय.
इंग्रजी व्याकरणातील 'Object' हे नेहमी Accusative Case चा समजला जातो.
Read more about Accusative Case
3. Possessive Case
'Possessive Case' (पझेसिव्ह केस) म्हणजे 'षष्ठी विभक्ती' होय.
इंग्रजी व्याकरणात Possessive Case चा उपयोग दोन nouns मधील संबंध दर्शविण्यासाठी केला जातो.
Read more about Possessive Case
4. Vocative Case
'Vocative Case' (व्होकेटिव्ह केस) म्हणजे 'संबोधन' होय.