Common Noun

सामान्यनाम

आपल्या सभोवती जी वस्तू किंवा जो प्राणी आपल्याला दिसतो, ती प्रत्येक निर्जीव वस्तू किंवा सजीव प्राणी ज्या नावाने ओळखला जातो, त्याला 'Common Noun' असे म्हणतात.

Common Noun म्हणजे काय?

Common Noun म्हणजे काय?

आपल्या सभोवती जी वस्तू किंवा जो प्राणी आपल्याला दिसतो, ती प्रत्येक निर्जीव वस्तू किंवा सजीव प्राणी काही ना काही नावाने ओळखला जातो.

अशा प्रत्येक नावाला 'Common Noun' (कॉमन नाऊन) म्हणजेच 'सामान्यनाम' असे म्हणतात.

Common Noun चे वचन

Common Noun चे वचन

इंग्रजी वाक्यामध्ये अनेक Common Nouns वापरलेली असतात. ती ओळखता येणे आवश्यक असते.

तसेच, वाक्यात वापरलेले Common Noun हे 'एकवचनी' आहे कि 'अनेकवचनी' आहे, हेदेखील लक्षात घ्यावे लागते.

एकवचनाला इंग्रजी व्याकरणात 'Singular Number' (सिंग्युलर नंबर) असे म्हणतात आणि अनेकवचनाला 'Plural Number' (प्ल्युरल नंबर) असे म्हणतात.

सामान्यतः ज्या Common Noun ला शेवटी 's', es, ies किंवा ves यांपैकी एखादा प्रत्यय लावलेला असतो, त्याला Plural Number चे Common Noun असे म्हणतात.

काही Common Nouns ही 'अनियमित' असल्यामुळे त्यांचे अनेकवचन करताना 'Irregular Nouns' चे नियम पाळावे लागतात.

For example (उदाहरणार्थ),
Common Noun
(सामान्यनाम)
मराठी अर्थ Number
(वचन)
farmer शेतकरी एकवचन
garden बाग एकवचन
teacher शिक्षक एकवचन
cow गाय एकवचन
cat मांजर एकवचन
parrot पोपट एकवचन
dogs कुत्रे अनेकवचन
wolves कोल्हे अनेकवचन
bench बाक एकवचन
countries देश अनेकवचन
branches फांद्या एकवचन
buffalo म्हैस एकवचन
river नदी एकवचन
Noun Proper Noun

This educational article was first posted on and last updated on by