Gender

पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग

इंग्रजी व्याकरणामध्ये एखादी व्यक्ती, वस्तू अथवा प्राणी यांच्या लिंगानुसार त्यांचे वर्गीकरण करण्यासाठी 'Gender' (जेन्डर) म्हणजेच 'लिंग' ही संज्ञा वापरली जाते.

'Gender' म्हणजे काय?

'Gender' म्हणजे काय?

इंग्रजी व्याकरणामध्ये एखादी व्यक्ती, वस्तू अथवा प्राणी यांच्या लिंगानुसार त्यांचे वर्गीकरण करण्यासाठी 'Gender' (जेन्डर) म्हणजेच 'लिंग' ही संज्ञा वापरली जाते.

Gender चे प्रकार

Gender चे प्रकार

इंग्रजी व्याकरणामध्ये Gender चे पुढीलप्रमाणे एकूण 'चार' प्रकार आहेत.

Masculine Gender

'Masculine Gender' (मॅस्क्युलिन् जेन्डर) म्हणजे 'पुल्लिंग' होय.

एखाद्या Noun किंवा Pronoun च्या रूपावरून जर पुरूषजातीचा बोध होत असेल, तर ते 'Masculine Gender' चे समजावे.

For example (उदाहरणार्थ), - man, father, brother, bull, he इत्यादी.

Feminine Gender

'Feminine Gender' (फेमिनाईन् जेन्डर) म्हणजे 'स्त्रीलिंग' होय.

एखाद्या Noun किंवा Pronoun च्या रूपावरून जर स्त्रीजातीचा बोध होत असेल, तर ते 'Feminine Gender' चे समजावे.

For example (उदाहरणार्थ), - woman, mother, sister, cow, she इत्यादी.

Neuter Gender

'Neuter Gender' (न्यूटर जेन्डर) म्हणजे 'नपुंसकलिंग' होय.

एखाद्या Noun किंवा Pronoun च्या रूपावरून जर पुरूषजाती किंवा स्त्रीजाती यांपैकी कोणाचाही बोध होत नसेल, तर ते 'Neuter Gender' चे समजावे.

सामान्यतः कोणतेही Material Noun आणि Abstract Noun हे नेहमी Neuter Gender चे समजले जाते.

For example (उदाहरणार्थ), - plate, phone, table, chair, bottle इत्यादी.

Common Gender

'Common Gender' (कॉमन जेन्डर) म्हणजे 'पुल्लिंग' आणि 'स्त्रीलिंग' असे दोन्हीही होय.

एखाद्या Noun किंवा Pronoun च्या रूपावरून जर पुरूषजाती आणि स्त्रीजाती या दोन्हींचा बोध होत असेल, तर ते 'Common Gender' चे समजावे.

Common Gender चे Noun हे पुरूष आणि स्त्री अशा दोन्हीही व्यक्तींबाबत वापरता येते. त्यामुळे Masculine Gender अथवा Feminine Gender चा उपयोग करताना सारखेच Noun वापरले जाते.

For example (उदाहरणार्थ),

Common Genderमराठी अर्थ
childमूल
babyमूल
parentआई / वडील
friendमित्र / मैत्रीण
cousinचुलतभाऊ / चुलतबहिण
studentविद्यार्थी / विद्यार्थिनी
neighbourशेजारी / शेजारीण
enemyशत्रू (स्त्री अथवा पुरूष)

वरील सर्व Nouns पुरूष आणि स्त्री या दोन्हींसाठी सारखीच आहेत. त्यामुळे त्यांचा समावेश Common Gender मध्ये केला जातो.

उदाहरणे

Masculine आणि Feminine Gender examples

पर्यायी नवीन शब्दाचा उपयोग करून

Masculine Gender च्या nouns साठी पर्यायी Feminine Gender ची काही nouns पुढीलप्रमाणे आहेत.

Masculine (पुल्लिंग)Feminine (स्त्रीलिंग)
man (पुरूष)woman (स्त्री)
boy (मुलगा)girl (मुलगी)
son (मुलगा)daughter (मुलगी)
father (वडील)mother (आई)
brother (भाऊ)sister (बहीण)
king (राजा)queen (राणी)
husband (नवरा)wife (बायको)
uncle (काका, मामा)aunt (काकी, मामी, मावशी)
bull (बैल)cow (गाय)
horse (घोडा)mare (घोडी)

एखादा शब्द जोडून (prefix, suffix)

Masculine (पुल्लिंग)Feminine (स्त्रीलिंग)
manservant (पुरूष नोकर)maidservant (स्त्री नोकर, मोलकरीण)
he-goat (बकरा)she-goat (बकरी)
cock-sparrow (चिमणा)hen-sparrow (चिमणी)
jack-ass (नर - गाढव)she-ass (मादी - गाढव)
grandfather (आजोबा)grandmother (आजी)
peacock (मोर)peahen (लांडोर)
washerman (धोबी)washerwoman (धोबीण)

'ess' हा प्रत्यय जोडून (suffix 'ess')

Masculine (पुल्लिंग)Feminine (स्त्रीलिंग)
god (देव)godess (देवी)
lion (सिंह)lioness (सिंहीण)
count (सरदार)countess (सरदार-पत्नी)
poet (कवी)poetess (कवयित्री)
actor (नट)actress (नटी)
emperor (सम्राट)empress (सम्राज्ञी)
Possessive Case Tense

This educational article was first posted on and last updated on by