Proper Noun म्हणजे काय?
Proper Noun म्हणजे काय?
एखाद्या सामान्यनामाच्या ठेवलेल्या विशेष नावाला 'Proper Noun' (प्रॉपर नाऊन) म्हणजेच 'विशेषनाम' असे म्हणतात.
पहिले अक्षर
नियम १
पहिले अक्षर
कोणत्याही Proper Noun चे पहिले अक्षर नेहमी 'Capital' लिहावे.
वचन
नियम २
एकवचन आणि अनेकवचन
Proper Noun हे नेहमी Singular Number (एकवचनी) असते. ते कधीही Plural Number (अनेकवचनी) नसते.
माणसाचे नाव
नियम ३
माणसाचे नाव
स्त्री पुरुषांना हाक मारण्यासाठी त्यांना जी नावे ठेवतात, त्यांच्या त्या नावांना Proper Noun असे म्हणतात.
For example (उदाहरणार्थ) -
Vijay, Sudhir, Amit, Leela, Radha, Gopal इत्यादी.
प्राण्याचे नाव
नियम ४
प्राण्याचे नाव
पाळीव प्राण्यांना हाक मारण्यासाठी आपण त्यांना नावे ठेवतो. पाळीव प्राण्यांना ठेवलेल्या अशा नावांना Proper Noun असे म्हणतात.
For example (उदाहरणार्थ) -
Moti, Max, Sheru, Teddy, Lucky, Mani, Tommy इत्यादी.
जागेचे नाव
नियम ५
जागेचे नाव
खेडी, शहरे, प्रांत, वसाहती, राज्ये, देश, खंड ज्या नावांनी ओळखली जातात, त्यांच्या नावांनासुद्धा Proper Noun असे म्हणतात.
For example (उदाहरणार्थ) -
Shastri Nagar, Mumbai, Raigad, Maharashtra, Satara, Pune, India, Asia, Africa इत्यादी.
नैसर्गिक नाव
नियम ६
नैसर्गिक नाव
दिशा, उपदिशा, टेकड्या, डोंगर, पर्वत यांच्या नावांना Proper Noun असे म्हणतात.
For example (उदाहरणार्थ) -
East, West, North-East, Rajmachi, Himalaya, Alps इत्यादी.
जलाशयाचे नाव
नियम ७
जलाशयाचे नाव
नद्या, तलाव, सरोवरे, पाणवठे, जलाशय, धरणे यांच्या नावांनासुद्धा Proper Noun असे म्हणतात.
For example (उदाहरणार्थ) -
Ganga, Godavari, Yamuna, Koyana, Dal Lake, Bhakra Nangal Dam इत्यादी.
आकाशीय नाव
नियम ८
आकाशीय नाव
आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, आकाशगंगा यांच्या ठेवलेल्या नावांना Proper Noun असे म्हणतात.
For example (उदाहरणार्थ) -
Orion, Aurora, Earth, Jupiter, Venus, The Milky Way, Krittika, Rohini, Hasta इत्यादी.
महीने, दिवस
नियम ९
महीने, दिवस
महिन्यांच्या आणि दिवसांच्या नावांना Proper Noun असे म्हणतात.
For example (उदाहरणार्थ) -
Sunday, Monday, Tuesday, January, February, March इत्यादी.
मानवनिर्मित नाव
नियम १०
मानवनिर्मित नाव
इमारतींना, बंगल्यांना, रस्त्यांना ठेवलेल्या नावांनासुद्धा Proper Noun असे म्हणतात.
For example (उदाहरणार्थ) -
Galaxy Apartments, The Solitaire Heights, Anand Niwas, Lal Bahadur Shastri Road इत्यादी.
आडनावाचे अनेकवचन
नियम ११
माणसाच्या आडनावाचे अनेकवचन
माणसांच्या आडनावांना सुद्धा Proper Noun असे म्हणतात. परंतु, अपवाद म्हणून त्याच्या शेवटी 's' हा प्रत्यय लावून त्याचे अनेकवचन करता येते.
जेव्हा एखाद्या आडनावाला 's' हा प्रत्यय लावून त्याचे अनेकवचन केलेले असते, तेव्हा त्याचा अर्थ 'संपूर्ण कुटुंब' (the whole family) असा होतो.
अशा अर्थाने 's' हा प्रत्यय लावून जे आडनाव लिहिलेले असते, त्याला नेहमी न विसरता 'the' हे article (उपपद) लावावे.
For example (उदाहरणार्थ) -
the Patils, the Deshmukhs, the Pawars, the Guravs इत्यादी.