How to use 'against'

Compound Preposition

against (अगेन्स्ट) हे एक Compound Preposition आहे.

Compound Preposition 'against'

Compound Preposition 'against'

against (अगेन्स्ट) हे एक Compound Preposition आहे.

Compound Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये against चा उपयोग पुढीलपैकी एक अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

against = विरुद्ध

against = विरुद्ध

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • He met them against his will.
  • तो त्यांना त्याच्या इच्छेविरुद्ध भेटला.
Example 2
  • India will win the first match against England.
  • इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना भारत जिंकेल.
against = वर (टेकून, खेटून)

against = वर (टेकून, खेटून)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • He was leaning against the wall.
  • तो भिंतीवर झुकला होता.
  • तो भिंतीला टेकून उभा होता.
Example 2
  • She was sitting against the window.
  • ती खिडकीवर (खिडकीला टेकून) बसली होती.
against = वर (..च्या पार्श्वभूमीवर, ..च्या वर उठून)

against = वर (..च्या पार्श्वभूमीवर, ..च्या वर उठून)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • The trees looked dark against the morning sky.
  • सकाळच्या आकाशावर झाडे गडद दिसत होती.
  • सकाळच्या आकाशातील रंगांच्या पार्श्वभूमीवर झाडे गडद दिसत होती.
Example 2
  • It is difficult to talk against this noise.
  • या आवाजावर (आवाजाच्या वर उठून) बोलणे कठीण आहे.
How to use 'after' along आणि alongside

This educational article was first posted on and last updated on by