How to use 'between'

Compound Preposition

इंग्रजी व्याकरणामध्ये between चा उपयोग adverb किंवा preposition यांपैकी एका प्रकारे करता येतो.

Compound Preposition 'between'

Compound Preposition 'between'

between (बिट्विन्) हे एक Compound Preposition आहे.

इंग्रजी व्याकरणामध्ये between चा उपयोग Adverb किंवा Preposition यांपैकी एका प्रकारे करता येतो.

Compound Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये between चा उपयोग पुढील अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

between = मध्ये ('दोहोंमध्ये' या अर्थाने)

between = मध्ये ('दोहोंमध्ये' या अर्थाने)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • The bond between brother and sister is very strong.
  • भाऊ आणि बहिण यांच्यामधील बंधन हे खूप भक्कम असते.
Example 2
  • The money will be divided between you and me.
  • ते पैसे तुझ्या माझ्यात (आपल्या दोघांमध्ये) विभागले जातील.

between आणि among मधील फरक

दोनपेक्षा अधिक वस्तू किंवा व्यक्ती यांच्यामध्ये असा उल्लेख करावयाचा असल्यास among चा उपयोग केला जातो.

मात्र, फक्त दोन वस्तू किंवा दोन व्यक्ती यांच्यामध्ये असा उल्लेख करावयाचा असल्यास नेहमी between चा उपयोग करावा.

How to use 'beside' How to use 'beyond'

This educational article was first posted on and last updated on by