How to use 'of'

Simple Preposition

of (ऑफ्) हे एक Simple Preposition आहे.

Simple Preposition 'of'

Simple Preposition 'of'

of (ऑफ्) हे एक Simple Preposition आहे.

इंग्रजी व्याकरणामध्ये of  चा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

of = ..चा, ..ची, ..चे, ..च्या (मालकीदर्शक)

of = ..चा, ..ची, ..चे, ..च्या (मालकीदर्शक)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • The walls of his house are white.
  • त्याच्या घराच्या भिंती पांढऱ्या (पांढऱ्या रंगाच्या) आहेत.
Example 2
  • The collection of short stories is very nice.
  • तो लघुकथांचा संग्रह खूप चांगला आहे.
of = ..चा (संबंधीचा)

of = ..चा (संबंधीचा)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • This novel is a story of love and romance.
  • ही कादंबरी एक प्रेमासंबंधीची रम्यकथा आहे.
Example 2
  • I like to watch news of war.
  • मला युद्धासंबंधीच्या बातम्या बघायला आवडतात.
of = ..चा (च्या बाजूला)

of = ..चा (च्या बाजूला)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • Goa is located to the south of Maharashtra.
  • गोवा महाराष्ट्राच्या दक्षिणेच्या बाजूला आहे.
Example 2
  • January comes at the beginning of year.
  • जानेवारी महिना वर्षाच्या सुरूवातीला येतो.
of = ..चा (च्या नावाचा)

of = ..चा (च्या नावाचा)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • India is situated in the Continent of Asia.
  • भारत देश आशिया (आशिया नावाच्या) खंडात वसलेला आहे.
Example 2
  • The City of Mumbai has better transportation than most other Indian cities.
  • इतर भारतीय शहरांपेक्षा मुंबई शहरात (मुंबई नावाच्या शहरात) दळणवळणाच्या चांगल्या सुविधा आहेत.
of = ..चा (पैकी भाग)

of = ..चा (पैकी भाग)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • She drank the whole of milk in the pot.
  • पातेल्यामधील दूध तिने संपूर्ण प्यायलं.
Example 2
  • He has inherited a half of a million dollars.
  • त्याला अर्धा दशलक्ष (दशलक्षाचा अर्धा भाग) डॉलर वारसाहक्काने मिळाले आहेत.
near आणि near to How to use 'off'

This educational article was first posted on and last updated on by