'Gerund' म्हणजे काय?
'Gerund' म्हणजे काय?
'Gerund' (जीरंड) म्हणजे 'धातुसाधित नाम' किंवा 'कृदंत' होय.
ज्या शब्दाने काही ना काही क्रिया सूचित होते, अशा शब्दाला क्रियादर्शक to चे verb असे म्हणतात.
अशा क्रियादर्शक शब्दाच्या शेवटी 'ing' हा प्रत्यय लावून Gerund तयार होते.
Gerund vs Present Participle
Gerund आणि Present Participle मधील फरक
कोणत्याही To च्या Verb ला शेवटी 'ing' प्रत्यय लावून जो नवीन शब्द तयार होतो त्याला एकतर Gerund किंवा Present Participle यांपैकी एक संज्ञा दिली जाते.
'Verb + ing' या शब्दाचा संबंध जेव्हा एखाद्या Noun शी जोडलेला असतो, तेव्हा त्या शब्दाला 'Present Participle' असे म्हणतात.
मात्रा, जेव्हा 'Verb + ing' हा शब्द वाक्यातील Transitive Main Verb (ट्रान्झीटिव्ह मेन व्हर्ब) ला जोडून वापरलेला असतो, तेव्हा त्याला 'Gerund' असे म्हणतात.
Noun Phrase
Noun Phrase मधील Gerund
Gerund पासून सुरू होणाऱ्या शब्दसमूहाला 'Noun Phrase' असे म्हणतात.
सामान्यतः Gerund हे वाक्यातील To च्या Verb नंतर त्याला जोडून वापरतात किंवा Gerund ने वाक्याची सुरूवात केली जाते.
Gerund जेव्हा वाक्याच्या सुरूवातीला येते, तेव्हा ते 'Subject' म्हणून कार्य करते आणि जेव्हा ते वाक्याच्या तिसऱ्या स्थानी येते, तेव्हा ते 'Object' म्हणून कार्य करते.
Noun Phrase as Subject
Noun Phrase as Subject
Gerund ने सुरू झालेली Noun Phrase जर वाक्याच्या सुरूवातीला वापरलेली असेल, तर त्या संपूर्ण शब्दसमूहाला वाक्याचा 'Subject' समजावे.
For example (उदाहरणार्थ),
- सकाळी लवकर उठणे हे प्रकृतीसाठी फार चांगले असते.
- Waking up early in the morning is very good for health.
वरील वाक्यामध्ये 'waking up early in the morning' ही Noun Phrase वाक्याच्या सुरूवातीला वाक्याचा 'Subject' म्हणून वापरण्यात आली आहे.
Noun Phrase as Object
Noun Phrase as Object
Gerund ने सुरू झालेली Noun Phrase जर वाक्याच्या तिसऱ्या स्थानी वापरलेली असेल, तर त्या संपूर्ण शब्दसमूहाला वाक्यातील 'Object' समजावे.
For example (उदाहरणार्थ),
- सकाळी लवकर उठण्याचे मी काल ठरवले होते.
- Yesterday I had decided waking up early in the morning
वरील वाक्यामध्ये 'waking up early in the morning' ही Noun Phrase वाक्याच्या तिसऱ्या स्थानी 'Object' म्हणून वापरण्यात आली आहे.
Examples
Examples (उदाहरणे)
Example 1
- सुंदर अक्षरात पत्र लिहिणे ही एक कला आहे.
- Writing a letter in good handwriting is an art.
Example 2
- माझ्या आईला पंढरपूरला जाण्याची इच्छा होती.
- My mother wished going to Pandharpur.
Example 3
- धुम्रपान करणे हे प्रकृतीसाठी घातक आहे.
- Smoking is harmful for health.
Example 4
- प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेत उत्तीर्ण होण्याची आशा असते.
- Every student wishes passing in the examination.
Example 5
- रोज पोहणे एक चांगला व्यायाम आहे.
- Swimming everyday is a good exercise.