had to ची रचना
जेव्हा एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला करावी लागत असे किंवा ती गोष्ट करावी लागली, असे म्हणावयाचे असते तेव्हा had to (हॅड टू) ची रचना वापरली जाते.
नियम १
या रचनेमध्ये had ला जोडून एखादे Infinitive वापरलेले असते. त्यामुळे या रचनेला had to ची रचना असे म्हणतात.
नियम २
had to ची रचना नेहमी Past Tense (पास्ट टेन्स) ची म्हणजेच भूतकाळाची समजली जाते.
नियम ३
had to च्या रचनेमध्ये had या क्रियापदाचा वापर वाक्यातील Main Verb म्हणून केलेला असतो.
त्यामुळे या रचनेतील वाक्यामध्ये had ला To have चे Verb किंवा Auxiliary Verb समजू नये.
नियम ४
वाक्याच्या Subject चे Person आणि Number यांचा had च्या स्वरूपावर काहीही परिणाम होत नाही.
| Person (पुरुष)  | 
Singular (एकवचन)  | 
Plural (अनेकवचन)  | 
|---|---|---|
| First Person  (प्रथम पुरुष)  | 
I had to | We had to | 
| Second Person  (द्वितीय पुरुष)  | 
You had to (तू)  | 
You had to (तुम्ही)  | 
| Third Person  (तृतीय पुरुष)  | 
He had to | They had to | 
| She had to | ||
| It had to | ||
| Singular Noun  + had to  | 
Plural Noun  + had to  | 
For example (उदाहरणार्थ),
Example 1
- रमेशला रोज सकाळी वर्तमानपत्रे वाटायला जावं लागत असे.
 - Ramesh had to distribute newspapers in the morning.
 
Example 2
- त्याला दररोज बाहेरचं जेवण खावं लागत असे.
 - He had to eat outside food everyday.
 
Example 3
- लहानपणी मला माझ्या बाबांसाठी जेवणाचा डबा घेऊन जावं लागत असे.
 - I had to take the tiffin box for my father in my childhood days.
 
Example 4
- माझी मोटारगाडी चालू होत नसल्यामुळे मला बसने जावं लागलं.
 - I had to take a bus since my car could not start.
 
Example 5
- त्याला तिच्यासाठी एक तास थांबावं लागलं.
 - He had to wait for her for an hour.