cannot आणि unable to

Modal Auxiliary Verb

cannot (कॅनॉट) हे 'can' चे Negative Sense (निगेटिव्ह सेन्स) चे म्हणजेच 'नकारार्थी' रूप आहे.

Modal Auxiliary Verb 'cannot'

Modal Auxiliary Verb 'cannot'

cannot (कॅनॉट) हे can चे Negative Sense (निगेटिव्ह सेन्स) चे म्हणजेच नकारार्थी रूप आहे.

जेव्हा आपण एखादी गोष्ट physically (फिजिकली) म्हणजे शारीरिकदृष्ट्या  किंवा mentally (मेन्टली) म्हणजे बौद्धिकदृष्ट्या करण्यास समर्थ नसतो, तेव्हा आपली शारीरिक किंवा बौद्धिक क्षमतेची मर्यादा व्यक्त करण्यासाठी cannot चा उपयोग केला जातो.

वाक्यात उपयोग करताना वाक्याच्या subject नंतर cannot चा क्रम लावावा आणि ते ज्या to च्या verb ला सहाय्य करते, ते नेहमी पहिल्या रूपाचे लिहावे.

इंग्रजी वाक्यामध्ये कधीकधी cannot ऐवजी can't हे त्याचे संक्षिप्त रूप सुद्धा वापरले जाते.

'unable to' किंवा 'not able to' चा वाक्यातील उपयोग

'unable to' किंवा 'not able to' चा वाक्यातील उपयोग

unable to किंवा not able to हे Modal Auxiliary Verb नसून ती एक क्षमतेची मर्यादा दाखवणारी रचना आहे.

जेव्हा आपल्याला शारीरिक किंवा बौद्धिक क्षमतेची शंका असते आणि त्यामुळे आपण ती गोष्ट करू शकणार नाही असा संभ्रम मनामध्ये असतो, तेव्हा unable to किंवा not able to च्या रचनेचा उपयोग केला जातो.

unable to किंवा not able to चा उपयोग करताना त्याच्या अगोदर योग्य ते to be चे verb वापरावे लागते. त्यासाठी वाक्याचा subject आणि tense लक्षात घ्यावा लागतो.

'cannot' आणि 'unable to' ची काही उदाहरणे

'cannot' आणि 'unable to' ची काही उदाहरणे

Example 1
  • तू ही कादंबरी तीन दिवसांत पूर्ण करू शकणार नाहीस.
  • You cannot complete this novel within three days.
  • You can't complete this novel within three days.
Example 2
  • चोरांना हे कुलूप उघडता येणार नाही.
  • Thieves cannot open this lock.
  • Thieves can't open this lock.
Example 3
  • विद्यार्थ्यांना बसशिवाय शाळेत येता येत नाही.
  • Students cannot come to school without bus.
  • Students can't come to school without bus.
Example 4
  • मला हे गणित सोडवता येत नाही.
  • I am unable to solve this example.
  • I am not able to solve this example.
Example 5
  • त्याला ती जड पिशवी उचलता आली नाही.
  • He was unable to lift the heavy bag.
  • He was not able to lift the heavy bag.
can आणि able to must

This educational article was first posted on and last updated on by