must

must चा वाक्यातील उपयोग

गरज, बंधन, कर्तव्य, निश्चय, खात्री आणि अनिवार्यता यांपैकी एखादा भाव व्यक्त करण्यासाठी must चा उपयोग केला जातो.

Modal Auxiliary Verb 'must'

Modal Auxiliary Verb 'must'

must (मस्ट) हे Modal Auxiliary Verb आहे.

गरज, बंधन, कर्तव्य, निश्चय, खात्री आणि अनिवार्यता यांपैकी एखादा भाव व्यक्त करण्यासाठी must चा उपयोग केला जातो.

'must' चे स्वरूप

'must' चे स्वरूप

must हे ज्या स्वरुपात दिसते, त्या एकाच स्वरुपात ते वाक्यामध्ये वापरले जाते. To च्या Verb प्रमाणे त्याला रूपे नसतात.

नियम २

वाक्यातील Subject च्या Person चा आणि Number चा must वर काहीही परिणाम होत नाही.

त्यामुळे, कोणत्याही Person च्या आणि Number च्या Subject सोबत must चा उपयोग करता येतो.

must सोबतचे main verb

must सोबतचे main verb

must सोबत नेहमी पहिल्या रूपाचे Main Verb वापरले जाते.

must सोबत वापरलेल्या पहिल्या रूपाच्या Main Verb ला खरे पाहता infinitive असे म्हणतात.

मात्र, हे infinitive इथे to काढून वापरलेले असल्यामुळे त्याला plain infinitive (प्लेन इन्फिनिटिव्ह) असेही म्हटले जाते.

must ने व्यक्त होणारा भाव

must ने व्यक्त होणारा भाव

जेव्हा आपण must एखाद्या वाक्यात वापरतो, तेव्हा त्या वाक्यातून आपण पुढीलपैकी कोणताही एक भाव व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो.

Necessity and Obligation

Necessity (नेसेसिटी) म्हणजे गरज किंवा Obligation (ऑब्लिगेशन्) म्हणजे बंधन किंवा कर्तव्य यांपैकी एक भाव व्यक्त करण्यासाठी must चा उपयोग केला जातो.

Read more about 'must' showing Necessity, Obligation

Determination

Determination (डिटर्मिनेशन्) म्हणजे निश्चय हा भाव व्यक्त करण्यासाठी must चा उपयोग केला जातो.

Read more about 'must' showing Determination

Duty

Duty (ड्युटी) म्हणजे कर्तव्य हा भाव व्यक्त करण्यासाठी must चा उपयोग केला जातो.

Read more about 'must' showing Duty

Certainty and Inevitability

Certainty (सर्टन्टी) म्हणजे खात्री किंवा Inevitability (इनेव्हिटिबिलिटी) म्हणजे अनिवार्यता यांपैकी एक भाव व्यक्त करण्यासाठी must चा उपयोग केला जातो.

Read more about 'must' showing Certainty, Inevitability
cannot आणि unable to must showing Necessity and Obligation

This educational article was first posted on and last updated on by