Singular Number आणि Plural Number
Singular Number आणि Plural Number
संख्येने एक असलेल्या कोणत्याही गोष्टीला Singular Number (सिंग्युलर नंबर) म्हणजे 'एकवचनी' असे म्हणतात.
त्याचप्रमाणे, संख्येने अनेक असलेल्या कोणत्याही गोष्टीला Plural Number (प्ल्युरल नंबर) म्हणजे 'अनेकवचनी' असे म्हणतात.
Plural Number कसे बनते?
Plural Number कसे बनते?
इंग्रजी भाषेमध्ये एकवचनी नामाचे अनेकवचन करण्याचे काही प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
Suffix 'es'
इंग्रजी व्याकरणामध्ये काही नामांचे अनेकवचन करताना त्यांना शेवटी 'es' हा प्रत्यय लावलेला असतो.
उदाहरणार्थ, classes, glasses, bushes, wishes
Suffix 's' किंवा 'ies'
इंग्रजी व्याकरणामध्ये काही नामांचे अनेकवचन करताना त्यांना शेवटी 's' किंवा 'ies' यांपैकी एखादा प्रत्यय लावलेला असतो.
उदाहरणार्थ, babies, cities, stories, skies
Read more about suffix 's' / 'ies'
Suffix 'ves'
इंग्रजी व्याकरणामध्ये काही नामांचे अनेकवचन करताना त्यांना शेवटी 'ves' हा प्रत्यय लावलेला असतो.
उदाहरणार्थ, wives, leaves, knives, wolves
Irregular Noun
Irregular Noun (इर्रेग्युलर नाउन) म्हणजे अनियमित नाम होय.
इंग्रजी व्याकरणामध्ये अनियमित नामाचे अनेकवचन स्वतंत्र असते किंवा एकसारखे असते.
उदाहरणार्थ, men, women, oxen, mice
Read more about Irregular Noun
Compound Noun
Compound Noun (कम्पाउंड नाउन) म्हणजे संयुक्त नाम होय.
इंग्रजी व्याकरणामध्ये संयुक्त नामाचे अनेकवचन करताना त्यातील मुख्य शब्दाचे अनेकवचन केले जाते.
उदाहरणार्थ, daughters-in-law, sons-in-law