Past Modal Verbs

should have, would have, could have

जेव्हा आपण विचार करतो की कदाचित भूतकाळ वेगळा असता तर काय घडले असते, तेव्हा अशी परिस्थिती दर्शविण्यासाठी 'Past Modal Verbs' (पास्ट मोडल व्हर्ब्स) चा उपयोग केला जातो.

'Past Modal Verbs' म्हणजे काय?

'Past Modal Verbs' म्हणजे काय?

जेव्हा आपण विचार करतो की कदाचित भूतकाळ वेगळा असता तर काय घडले असते, तेव्हा अशी परिस्थिती दर्शविण्यासाठी 'Past Modal Verbs' (पास्ट मोडल व्हर्ब्स) चा उपयोग केला जातो.

Past Modal Verbs ना 'Modals of Lost Opportunity' (मोडल्स ऑफ लॉस्ट ऑपॉर्च्युनिटी) असेही म्हटले जाते.

'Past Modal Verbs' चे प्रकार

'Past Modal Verbs' चे प्रकार

इंग्रजी व्याकरणात Past Modal Verbs पुढीलप्रमाणे 'तीन' प्रकारची आहेत.

1. should have

एखादी गोष्ट 'कर्तव्य' किंवा 'नैतिक बंधन' म्हणून करावयाची असते आणि ती तशी करण्याचे आपल्याकडून राहून जाते. हे दर्शविण्यासाठी 'should have' (शुड हॅव्) चा उपयोग केला जातो.

2. would have

एखादी गोष्ट ज्यावेळी करणे आवश्यक असते, त्यावेळी ती न करता तशीच सोडून दिल्यानंतर कालांतराने ती गोष्ट आपण केली असती, असे आपल्या मनात येते. हे दर्शविण्यासाठी 'would have' (वुड हॅव्) चा उपयोग केला जातो.

3. could have

एखादी गोष्ट आपण वेळेवर न केल्यामुळे ती गोष्ट राहून जाते. मात्र, अशी राहून गेलेली गोष्ट करण्याची आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता असते असे आपल्या लक्षात येते. हे दर्शविण्यासाठी 'could have' (कुड हॅव्) चा उपयोग केला जातो.

Auxiliary Verb Infinitive

This educational article was first posted on and last updated on by