Future Tense चे to be चे verb
Future Tense चे to be चे verb
वाक्यातील subject कोणत्या state (स्टेट) म्हणजे स्थितीमध्ये आहे याची माहिती to be च्या verb मुळे मिळते.
Future Tense (फ्यूचर टेन्स) चे to be चे verb म्हणजे भविष्यकालवाचक स्थितीदर्शक क्रियापद होय.
यामध्ये पुढील verbs चा समावेश होतो –
- shall be
- will be
वाक्यातील उपयोगानुसार shall be आणि will be यांना primary auxiliary verb किंवा to be चे verb यांपैकी एक संज्ञा दिली जाते.
Person आणि Number
shall be, will be चा वाक्यातील उपयोग
इंग्रजी वाक्याचा subject हा नेहमी nominative case च्या स्वरूपात असतो.
वाक्यातील subject चे person लक्षात घेऊन वाक्यामध्ये योग्य ते to be चे verb वापरावे लागते.
Subject च्या number चा Future Tense च्या to be च्या verb वर काहीही परिणाम होत नाही.
Person (पुरुष) | Singular (एकवचन) | Plural (अनेकवचन) |
|---|---|---|
First Person | I shall be (मी असेन) | We shall be (आम्ही असू) |
Second Person | You will be (तू असशील) | You will be (तुम्ही असाल) |
Third Person | He will be (तो असेल) | They will be (ते असतील) |
Third Person | She will be (ती असेल) | They will be (ते असतील) |
Third Person | It will be (तो / ती / ते असेल) | They will be (ते असतील) |
Third Person | Singular Number Noun + will be | Plural Number Noun + will be |
shall be, will be ची काही उदाहरणे
shall be, will be ची काही उदाहरणे
Example 1
- I shall be late.
- मला उशीर होईल.
Example 2
- Ramesh will be with his mother tomorrow.
- रमेश उद्या त्याच्या आईसोबत असेल.
Example 3
- He will be in Australia tomorrow.
- तो उद्या ऑस्ट्रेलियामध्ये असेल.
Example 4
- Next year they will be in 10th standard.
- पुढील वर्षी ते दहाव्या इयत्तेत असतील.
Example 5
- Mother will be in the kitchen.
- आई स्वयंपाकघरात असेल.