was, were

Past Tense चे to be चे verb

Past Tense (पास्ट टेन्स) चे to be चे verb म्हणजे 'भूतकालवाचक स्थितीदर्शक क्रियापद' होय.

Past Tense चे to be चे verb

Past Tense चे to be चे verb

वाक्यातील subject कोणत्या state (स्टेट) म्हणजे स्थितीमध्ये आहे याची माहिती to be च्या verb मुळे मिळते.

Past Tense (पास्ट टेन्स) चे to be चे verb म्हणजे भूतकालवाचक स्थितीदर्शक क्रियापद होय.

यामध्ये पुढील verbs चा समावेश होतो –

  • was
  • were

was आणि were च्या वाक्यातील उपयोगानुसार त्यांना primary auxiliary verb किंवा to be चे verb यांपैकी एक संज्ञा दिली जाते.

Person आणि Number

was, were चा वाक्यातील उपयोग

इंग्रजी वाक्याचा subject हा नेहमी nominative case च्या स्वरूपात असतो.

वाक्यातील subject चे person आणि number लक्षात घेऊन वाक्यामध्ये योग्य ते to be चे verb वापरावे लागते.

Person

(पुरुष)

Singular

(एकवचन)

Plural

(अनेकवचन)

First Person

I was

(मी होतो)

We were

(आम्ही होतो)

Second Person

You were

(तू होतास)

You were

(तुम्ही होतात)

Third Person

He was

(तो होता)

They were

(ते होते)

Third Person

She was

(ती होती)

They were

(ते होते)

Third Person

It was

(तो होता / ती होती / ते होते)

They were

(ते होते)

Third Person

Singular Number Noun + was

Plural Number Noun + were

was, were ची काही उदाहरणे

was, were ची काही उदाहरणे

Example 1
  • Yesterday it was Saturday.
  • काल शनिवार होता.
Example 2
  • Last Monday she was in Mumbai.
  • मागच्या सोमवारी ती मुंबईमध्ये होती.
Example 3
  • He was an old man.
  • तो एक म्हातारा माणूस होता.
Example 4
  • Last year they were in 10th standard.
  • मागील वर्षी ते दहाव्या इयत्तेत होते.
Example 5
  • It was a terrible earthquake.
  • तो भूकंप खूप भयानक होता.
am, is, are shall be, will be

This educational article was first posted on and last updated on by