am, is, are

Present Tense चे to be चे verb

Present Tense (प्रेझेंट टेन्स) चे to be चे verb म्हणजे 'वर्तमानकालवाचक स्थितीदर्शक क्रियापद' होय.

Present Tense चे to be चे verb

Present Tense चे to be चे verb

वाक्यातील subject कोणत्या state (स्टेट) म्हणजे स्थितीमध्ये आहे याची माहिती to be च्या verb मुळे मिळते.

Present Tense (प्रेझेंट टेन्स) चे to be चे verb म्हणजे वर्तमानकालवाचक स्थितीदर्शक क्रियापद होय.

यामध्ये पुढील verbs चा समावेश होतो –

  • am
  • is
  • are

am, is आणि are च्या वाक्यातील उपयोगानुसार त्यांना primary auxiliary verb किंवा to be चे verb यांपैकी एक संज्ञा दिली जाते.

Person आणि Number

am, is, are चा वाक्यातील उपयोग

इंग्रजी वाक्याचा subject हा नेहमी nominative case च्या स्वरूपात असतो.

वाक्यातील subject चे person आणि number लक्षात घेऊन वाक्यामध्ये योग्य ते to be चे verb वापरावे लागते.

Person

(पुरुष)

Singular

(एकवचन)

Plural

(अनेकवचन)

First Person

I am

(मी आहे)

We are

(आम्ही आहोत)

Second Person

You are

(तू आहेस)

You are

(तुम्ही आहात)

Third Person

He is

(तो आहे)

They are

(ते आहेत)

Third Person

She is

(ती आहे)

They are

(ते आहेत)

Third Person

It is

(तो / ती / ते आहे)

They are

(ते आहेत)

Third Person

Singular Number Noun + is

Plural Number Noun + are

am, is, are ची काही उदाहरणे

am, is, are ची काही उदाहरणे

Example 1
  • A dog is a four-legged animal.
  • कुत्रा एक चार पायांचा प्राणी आहे.
Example 2
  • They are farmers.
  • ते शेतकरी आहेत.
Example 3
  • I am very tired.
  • मी खूप दमलो आहे.
Example 4
  • English is a global language.
  • इंग्रजी एक जागतिक भाषा आहे.
Example 5
  • Physics, Chemistry and Biology are different branches of Science.
  • भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखा आहेत.
To be चे Verb was, were

This educational article was first posted on and last updated on by