Future Tense चे to have चे verb
Future Tense चे to have चे verb
वाक्यातील subject च्या possession (पझेशन) म्हणजे मालकीबद्दल किंवा स्वामित्वाबद्दल ची माहिती to have च्या verb मुळे मिळते.
Future Tense (फ्यूचर टेन्स) चे to have चे verb म्हणजे भविष्यकालवाचक स्वामित्वदर्शक क्रियापद होय.
यामध्ये पुढील verb चा समावेश होतो –
- shall have
- will have
वाक्यातील उपयोगानुसार shall have, will have ला primary auxiliary verb किंवा to have चे verb यांपैकी एक संज्ञा दिली जाते.
Person आणि Number
shall have, will have चा वाक्यातील उपयोग
इंग्रजी वाक्याचा subject हा नेहमी nominative case च्या स्वरूपात असतो.
वाक्यातील subject चे person लक्षात घेऊन वाक्यामध्ये योग्य ते to have चे verb वापरावे लागते.
Subject च्या number चा Future Tense च्या to have च्या verb वर काहीही परिणाम होत नाही.
Person (पुरुष) |
Singular (एकवचन) |
Plural (अनेकवचन) |
|---|---|---|
First Person |
I shall have (माझ्याकडे असेल) |
We shall have (आमच्याकडे असेल) |
Second Person |
You will have (तुझ्याकडे असेल) |
You will have (तुमच्याकडे असेल) |
Third Person |
He will have (त्याच्याकडे असेल) |
They will have (त्यांच्याकडे असेल) |
Third Person |
She will have (तिच्याकडे असेल) |
They will have (त्यांच्याकडे असेल) |
Third Person |
It will have (त्याच्याकडे असेल / तिच्याकडे असेल) |
They will have (त्यांच्याकडे असेल) |
Third Person |
Singular Number Noun + will have |
Plural Number Noun + will have |
shall have, will have ची काही उदाहरणे
shall have, will have ची काही उदाहरणे
Example 1
- I shall have a new car in the next month.
- माझ्याकडे पुढील महिन्यात नवीन मोटारगाडी असेल.
Example 2
- Ramesh will have a new dog tomorrow.
- उद्या रमेशकडे नवीन कुत्रा असेल.
Example 3
- They will have a holiday on Saturday.
- त्यांना शनिवारी सुट्टी असेल.
Example 4
- She will have new dresses for Diwali.
- तिच्याकडे दिवाळीसाठी नवीन कपडे असतील.
Example 5
- The party will have the majority in this election.
- या मतदानामध्ये त्या पक्षाकडे बहुमत असेल.