Past Tense चे to have चे verb
Past Tense चे to have चे verb
वाक्यातील subject च्या possession (पझेशन) म्हणजे मालकीबद्दल किंवा स्वामित्वाबद्दल ची माहिती to have च्या verb मुळे मिळते.
Past Tense (प्रेझेंट टेन्स) चे to have चे verb म्हणजे भूतकालवाचक स्वामित्वदर्शक क्रियापद होय.
यामध्ये पुढील verb चा समावेश होतो –
- had
वाक्यातील उपयोगानुसार had ला primary auxiliary verb किंवा to have चे verb यांपैकी एक संज्ञा दिली जाते.
Person आणि Number
had चा वाक्यातील उपयोग
इंग्रजी वाक्याचा subject हा नेहमी nominative case च्या स्वरूपात असतो.
वाक्यातील subject चे person आणि number चा Past Tense च्या to have च्या verb वर काहीही परिणाम होत नाही.
Person (पुरुष) |
Singular (एकवचन) |
Plural (अनेकवचन) |
|---|---|---|
First Person |
I had (माझ्याकडे होते) |
We had (आमच्याकडे होते) |
Second Person |
You had (तुझ्याकडे होते) |
You had (तुमच्याकडे होते) |
Third Person |
He had (त्याच्याकडे होते) |
They had (त्यांच्याकडे होते) |
Third Person |
She had (तिच्याकडे होते) |
They had (त्यांच्याकडे होते) |
Third Person |
It had (त्याच्याकडे होते / तिच्याकडे होते) |
They had (त्यांच्याकडे होते) |
Third Person |
Singular Number Noun + had |
Plural Number Noun + had |
had ची काही उदाहरणे
had ची काही उदाहरणे
Example 1
- I had a bicycle.
- माझ्याकडे एक सायकल होती.
Example 2
- He had a note of five hundred rupees.
- त्याच्याकडे एक पाचशेची नोट होती.
Example 3
- My friend had two dogs.
- माझ्या मित्राकडे दोन कुत्रे होते.
Example 4
- Vilas had a collection of rare coins.
- विलासकडे दुर्मिळ नाण्यांचा संग्रह होता.
Example 5
- Rajesh had a gold plated pen.
- राजेशकडे सोन्याचा मुलामा चढवलेलं पेन होतं.