Simple Future Tense

साधा भविष्यकाळ

जेव्हा एखादी क्रिया पुढे केव्हातरी होणार आहे असे सूचित करायचे असते, तेव्हा अशी होणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी Simple Future Tense चा उपयोग करतात.

'Simple Future Tense' म्हणजे काय?

'Simple Future Tense' म्हणजे काय?

Simple Future Tense (सिम्पल फ्यूचर टेन्स) म्हणजे 'साधा भविष्यकाळ' होय.

जेव्हा एखादी क्रिया पुढे केव्हातरी होणार आहे असे सूचित करायचे असते, तेव्हा अशी होणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी Simple Future Tense चा उपयोग करतात.

Simple Future Tense चे वाक्य

Simple Future Tense चे वाक्य

इंग्रजी वाक्यात subject नंतर वाक्याच्या दुसऱ्या स्थानी जेव्हा 'shall' किंवा 'will' यांपैकी एक auxiliary verb (सहाय्यक क्रियापद) वापरलेले असते आणि त्याच्यासोबत Present Tense चे म्हणजे पहिल्या रूपाचे To चे Verb वापरलेले असते, तेव्हा त्या वाक्याला 'Simple Future Tense' चे वाक्य असे म्हणतात.

मराठी वाक्यात शेवटी वापरलेले क्रियापद, त्याची क्रिया आणि उच्चार लक्षात घेऊन ही क्रिया झालेली आहे कि अद्याप व्हायची आहे, हे लक्षात घ्यावे लागते.

क्रियापदाच्या उच्चारावरून जर असे लक्षात आले की ही क्रिया अद्याप व्हायची आहे, तर असे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Simple Future Tense चा उपयोग करावा लागतो.

Examples

For example (उदाहरणार्थ),

Example 1
  • उद्या ही गाडी मुंबईहून पुण्याला जाईल.
  • The bus will go to Pune from Mumbai tomorrow..

वरील मराठी वाक्यामध्ये जाईल हे क्रियापद वापरलेले असून ही क्रिया अद्याप व्हायची आहे.

त्यामुळे हे वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Simple Future Tense चा उपयोग करावा लागतो.

इंग्रजी वाक्य Simple Future Tense चे असल्यामुळे दुसऱ्या स्थानी will हे Auxiliary Verb आणि त्याच्यासोबत go या To च्या Verb चे पहिले रूप वापरलेले आहे.

Example 2
  • मी घरी पोचल्यावर तुला फोन करेन.
  • I will call you when I reach home.

वरील मराठी वाक्यामध्ये फोन करेन हे क्रियापद वापरलेले असून ही क्रिया अद्याप व्हायची आहे.

त्यामुळे हे वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Simple Future Tense चा उपयोग करावा लागतो.

इंग्रजी वाक्य Simple Future Tense चे असल्यामुळे दुसऱ्या स्थानी will हे Auxiliary Verb आणि त्याच्यासोबत call या To च्या Verb चे पहिले रूप वापरलेले आहे.

Example 3
  • आम्हाला तुमची मदत लागेल.
  • We will need your help.

वरील मराठी वाक्यामध्ये लागेल हे क्रियापद वापरलेले असून ही क्रिया अद्याप व्हायची आहे.

त्यामुळे हे वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Simple Future Tense चा उपयोग करावा लागतो.

इंग्रजी वाक्य Simple Future Tense चे असल्यामुळे दुसऱ्या स्थानी will हे Auxiliary Verb आणि त्याच्यासोबत need या To च्या Verb चे पहिले रूप वापरलेले आहे.

Example 4
  • पक्षी या झाडावर घरटी बांधतील.
  • Birds will build their nests on this tree.

वरील मराठी वाक्यामध्ये बांधतील हे क्रियापद वापरलेले असून ही क्रिया अद्याप व्हायची आहे.

त्यामुळे हे वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Simple Future Tense चा उपयोग करावा लागतो.

इंग्रजी वाक्य Simple Future Tense चे असल्यामुळे दुसऱ्या स्थानी will हे Auxiliary Verb आणि त्याच्यासोबत build या To च्या Verb चे पहिले रूप वापरलेले आहे.

Example 5
  • माझ्या वाढदिवसाला मला भरपूर भेटवस्तू मिळतील.
  • I will get a lot of gifts on my birthday.

वरील मराठी वाक्यामध्ये मिळतील हे क्रियापद वापरलेले असून ही क्रिया अद्याप व्हायची आहे.

त्यामुळे हे वाक्य इंग्रजीमध्ये रूपांतरित करताना Simple Future Tense चा उपयोग करावा लागतो.

इंग्रजी वाक्य Simple Future Tense चे असल्यामुळे दुसऱ्या स्थानी will हे Auxiliary Verb आणि त्याच्यासोबत get या To च्या Verb चे पहिले रूप वापरलेले आहे.

Simple Future Tense ची इतर उदाहरणे

Example 6
  • वाढत्या व्याजदरामुळे नजीकच्या भविष्यात आर्थिक वाढीवर परिणाम होईल.
  • Rising interest rates will impact financial growth over the foreseeable future.
Example 6
  • कमकुवत रूपयामुळे निर्यात महाग होईल.
  • A weaker rupee will make exports expensive.
Simple Past Tense Present Continuous Tense

This educational article was first posted on and last updated on by