have आणि has

Present Tense चे to have चे verb

Present Tense (प्रेझेंट टेन्स) चे to have चे verb म्हणजे 'वर्तमानकालवाचक स्वामित्वदर्शक क्रियापद' होय.

Present Tense चे to have चे verb

Present Tense चे to have चे verb

वाक्यातील subject च्या possession (पझेशन) म्हणजे मालकीबद्दल किंवा स्वामित्वाबद्दल ची माहिती to have च्या verb मुळे मिळते.

Present Tense (प्रेझेंट टेन्स) चे to have चे verb म्हणजे वर्तमानकालवाचक स्वामित्वदर्शक क्रियापद होय.

यामध्ये पुढील verbs चा समावेश होतो –

  • have
  • has

वाक्यातील उपयोगानुसार have आणि has यांना primary auxiliary verb किंवा to have चे verb यांपैकी एक संज्ञा दिली जाते.

Person आणि Number

have, has चा वाक्यातील उपयोग

इंग्रजी वाक्याचा subject हा नेहमी nominative case च्या स्वरूपात असतो.

वाक्यातील subject चे person आणि number लक्षात घेऊन वाक्यामध्ये योग्य ते to have चे verb वापरावे लागते.

Person

(पुरुष)

Singular

(एकवचन)

Plural

(अनेकवचन)

First Person

I have

(माझ्याकडे आहे)

We have

(आमच्याकडे आहे)

Second Person

You have

(तुझ्याकडे आहे)

You have

(तुमच्याकडे आहे)

Third Person

He has

(त्याच्याकडे आहे)

They have

(त्यांच्याकडे आहे)

Third Person

She has

(तिच्याकडे आहे)

They have

(त्यांच्याकडे आहे)

Third Person

It has

(त्याच्याकडे आहे / तिच्याकडे आहे)

They have

(त्यांच्याकडे आहे)

Third Person

Singular Number Noun + has

Plural Number Noun + have

have, has ची काही उदाहरणे

have, has ची काही उदाहरणे

Example 1
  • We have twenty cows.
  • आमच्याकडे वीस गायी आहेत.
Example 2
  • He has a big collection of books.
  • त्याच्याजवळ पुस्तकांचा मोठा संग्रह आहे.
Example 3
  • She has three brothers.
  • तिला तीन भाऊ आहेत.
Example 4
  • Ramesh has a house in Mumbai.
  • रमेशचे मुंबईला एक घर आहे.
Example 5
  • Trees have many branches.
  • झाडांना खूप फांद्या असतात.
To have चे verb had

This educational article was first posted on and last updated on by