Adverb Clause of Condition – विषय सूची
- इंग्रजी व्याकरणातील ‘Adverb Clause of Condition’
- ‘Main Clause’ आणि ‘Subordinating Clause’
- ‘Adverb Clause of Condition’ चे चार गट
Analysis of Complex Sentence आणि Adverb Clause हे विषय आधी समजून घ्यावेत, जेणेकरून Adverb Clause of Condition समजून घेणे अधिक सोपे होईल.
Adverb Clause of Condition
इंग्रजी व्याकरणातील Complex Sentence (कॉम्प्लेक्स सेन्टेन्स) मध्ये जे गौणवाक्य adverb म्हणून वापरलेले असते, त्याला Adverb Clause (ऍड्व्हर्ब क्लॉज्) म्हणजेच क्रियाविशेषणवाचक गौणवाक्य असे म्हणतात.
अशा Adverb Clause चा उपयोग वाक्यामध्ये जेव्हा एखादी अट दर्शविण्यासाठी केलेला असतो, तेव्हा त्या Adverb Clause ला Adverb Clause of Condition (ऍड्व्हर्ब क्लॉज् ऑफ कंडीशन) म्हणजेच अटवाचक क्रियाविशेषणात्मक गौणवाक्य असे म्हणतात.
‘Main Clause’ आणि ‘Subordinating Clause’
Complex Sentence मधील दोन वेगवेगळी वाक्ये एकत्र जोडण्यासाठी एखाद्या Subordinating Conjunction चा उपयोग केलेला असतो.
अशा वाक्यातील Subordinating Conjunction ने सुरू होणाऱ्या वाक्याला गौणवाक्य असे म्हणतात, तर दुसऱ्या वाक्याला मुख्यवाक्य असे म्हणतात.
गौणवाक्याला इंग्रजी व्याकरणामध्ये Subordinating Clause (सबॉर्डिनेटिंग् क्लॉज्) असे म्हणतात.
तसेच, मुख्यवाक्याला इंग्रजी व्याकरणामध्ये Main Clause (मेन क्लॉज्) किंवा Principal Clause (प्रिन्सिपल क्लॉज्) असे म्हणतात.
इंग्रजी व्याकरणातील Adverb Clause of Condition ची विभागणी त्यांमध्ये वापरलेल्या Subordinating Conjunction च्या उपयोगानुसार साधारणपणे चार गटांमध्ये केलेली आहे.
First Group (पहिला गट)
यांमध्ये if, unless, whether, इत्यादी Subordinating Conjunctions चा उपयोग केलेला असतो.
Adverb of Condition – First GroupSecond Group (दुसरा गट)
यांमध्ये वाक्याची सुरूवात had, were, did यांपैकी एखाद्या Primary Auxiliary Verb ने केलेली असते.
Adverb of Condition – Second GroupThird Group (तिसरा गट)
यांमध्ये whichever, whatever, however यांपैकी एखाद्या Subordinating Conjunction चा उपयोग केलेला असतो.
Adverb of Condition – Third GroupFourth Group (चौथा गट)
या गटातील मिश्र वाक्यामध्ये in case, but that, supposing इत्यादी Phrases चा उपयोग केलेला असतो.
Adverb of Condition – Fourth Group