जेव्हा एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय असते, तेव्हा ती सवय व्यक्त करण्याकरिता used to किंवा accustomed to च्या रचनेचा वापर केला जातो.
नियम २ही रचना पुढील स्वरूपात वाक्यामध्ये वापरली जाते.
Subject + To be चे Verb + used to / accustomed to + Noun / Gerund
नियम ३used to आणि accustomed to या दोन्हीही रचनांचा मराठी अर्थ सवय असणे असाच आहे.
त्यामुळे हा अर्थ व्यक्त करण्याकरिता या दोन्हीपैकी कोणतीही रचना वैकल्पिकरित्या (alternatively) वापरता येते.
नियम ४ज्या गोष्टीची सवय आहे, हे दाखवायचे असते, ती गोष्ट to नंतर एखाद्या Noun किंवा Gerund च्या स्वरूपात लिहावी लागते.
नियम ५used to / accustomed to ला जोडून त्याच्या आधी वाक्याच्या काळानुसार Present Tense / Past Tense / Future Tense चे To be चे Verb वापरलेले असते.
नियम ६जेव्हा वाक्यातून सवय नसणे असा Negative (नकारार्थी) अर्थ निर्माण करावयाचा असतो, तेव्हा वाक्यातील To be च्या Verb ला not जोडावे.
Examples (उदाहरणार्थ) Ex. 1-
माझ्या लहानपणापासून मला चहाची सवय नाही.
-
I am not used to tea since my childhood.
-
I am not accustomed to tea since my childhood.
-
अनेकांना पहाटे फिरायला जाण्याची सवय असते.
-
Many people are used to taking a walk in the early hours of the morning.
-
Many people are accustomed to taking a walk in the early hours of the morning.
-
बंद खोलीत बसण्याची तिला सवय नव्हती.
-
She was not used to sitting in a closed room.
-
She was not accustomed to sitting in a closed room.